Google Ad
Editor Choice

नवी सांगवी- सांगवीत रामनवमी उत्सवाचा जल्लोष … रामनवमी उत्सवानिमित्त महिलांची बाईक रॅली!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज तमाम हिंदू धर्मियांचे आराध्य प्रभु श्रीराम यांचा जन्म दिवस अर्थात राम नवमी निमित्त रामनवमीनिमित्ताने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नवी सांगवी -पिंपळे गुरव -सांगवी भागात या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि युवती सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून सर्व सण उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आदेश प्रशासनातर्फे होते. त्यामुळे रामनवमी उत्सव गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना साजरा करता येत नव्हता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निर्बंध उठल्याने यंदा रामनवमी उत्सव हा मोठ्या जल्लोषात पिंपळे गुरव-नवी सांगवी मध्ये साजरा होताना दिसून आला.

Google Ad

नवी सांगवीतील साई चौक या ठिकाणाहून या भव्य बाइक रॅलीला सुरुवात करण्यात आली. नवी सांगवी-सांगवी-पिंपळे गुरव या भागातून या बाईक रॅली दरम्यान ‘जय श्रीरामचा’ जयघोष झाल्याचे बघावयास मिळाले आहे. या रॅलीमध्ये युवती तसेच महिलांनी भगवे फेटे, परिधान करून गाडीला तसेच हातात भगवे झेंडे घेतल्याने रॅली लक्षवेधी ठरत होती.

नवी सांगवीतील भाजपच्या कार्यालयात श्रीरामाच्या प्रतिमेस, भव्य सजावट, देखावा आणि आकर्षक लाईट रोषणाई केली होती. या ठिकाणी सकाळी १० वाजता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी दर्शनाचा लाभ घेतला, यावेळी परिसरातील नागरिक आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लॉकडाउननंतर यंदा आता राम नवमीच्या निमित्तानेही शहरात आध्यात्मिक आनंदोत्सव साजरा झाल्याचे दिसून आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!