Google Ad
Uncategorized

निसर्गकवी हरपला…! अशा शब्दांत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची ना. धों. महानोरांना श्रद्धांजली!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ ऑगस्ट) : ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन, ग्रामीण संस्कृतीचे वैभव मराठी साहित्यात आणले.

निसर्गकवी हरपला…! अशा शब्दांत भाजपा शहराध्यक्ष ‘शंकर जगताप’ यांनी ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Google Ad

निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

समृद्ध शेतकरी आणि निसर्गावर अफाट माया असणारे पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले. जैत रे जैत सारख्या चित्रपटातील कवितांनी तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहून केलेल्या कवितांनी त्यांनी काव्यविश्वाला मोलाचा ठेवा दिला. त्यांच्या जाण्याने

निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, काव्यविश्वाची मोठी हानी झाली, असे शंकर जगताप यांनी म्हटले आहे.

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!