Google Ad
Editor Choice

द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथे हॉकीचे जादूगर ‘मेजर ध्यानचंद’ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑगस्ट) : प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा दिवस सर्व भारतभर राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. अशा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू ,व राष्ट्रीय पंच म्हणून प्रख्यात असलेले, माननीय शशीधर रमय्या हे उपस्थित होते. सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन केले. व कार्यक्रमास सुरुवात झाली.

Google Ad

प्रथमत: या दिनाचे महत्त्व प्रायमरी मुख्याध्यापिका मा. जयश्री माळी मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून विशद केले. इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी सेजल पवार,संस्कृती भुतकर,व इयत्ता बारावीची साक्षी भालेकर यांनी आपल्या मनोगतातून खेळाचे महत्व सांगितले. नंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून खेळाचे जीवनातील अत्यंत महत्त्व व सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात खेळापासून दूर चाललेल्या मुलांसाठी खेळा प्रती आवड निर्माण व्हावी यासाठी उत्तम असे मार्गदर्शन केले. व खेळातील बारकावे स्पष्ट करत प्रामाणिकपणाने खेळ कसा खेळावा इत्यादी अनेक बाबींवर विश्लेषण करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.

तसेच विद्यार्थी हा अभ्यासात कमी असला तरी प्रत्येक विद्यार्थ्यात विविध कलांचा आविष्कार असतो, तो त्यांनी आत्मसात करून त्यांच्या कला जोपासाव्यात हेही सांगण्यात ते विसरले नाही. नंतर कॉलेजच्या प्राचार्या मा. इनायत मुजावर मॅडम यांनी फक्त व्हिडिओ, गेम वगैरे यात न रमता हॉकी, इतर शारीरिक खेळांकडेही लक्ष द्यावे, तसेच गणपती बाप्पा मेकिंग,राखी मेकिंग, विविध पोस्टर्स मेकिंग, केलेल्या या विविध गुणांनीयुक्त विद्यार्थ्यांनी अशाच आपल्या कला अधिक जोपासाव्यात हे सांगून मुलांच्या विविध गुणांचे कौतुकही केले व त्यांनी असेच विविध कला पुढे वृद्धिंगत कराव्यात, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष मा.विजू अण्णा जगताप , सचिव मा. शंकर शेठ जगताप संचालिका मा.स्वाती पवार मॅडम मा.देवराम पिंजण सर तसेच इतर संचालक मंडळ, व सर्व शिक्षक स्टाफ हजर होते. कार्यक्रमासाठी मशाल ज्योत घेऊन राष्ट्रीय खेळाडू कुमारी गायत्री मोरे हिने संचलन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन १२ वी विद्यार्थिनी गौरी नवाळे हीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीटी शिक्षक दत्ता कांबळे,संजय पारते व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. शेवटी पीटी शिक्षक दत्ता कांबळे सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!