Google Ad
Editor Choice Maharashtra

Nashik : चमत्कार , नाशिकमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर दंडाला लोखंड , स्टील चिटकलं … पण, अशा अफवांना चिकटू नका!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१०जून) : नाशिकमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय. 72 वर्षीय अरविंद सोनार यांनी 8 दिवसांपूर्वी कोरोनाच्या लसीचा डोस घेतला होता. मात्र, आता त्यांच्या अंगाला लोखंड, स्टीलच्या वस्तू तसेच नाणी अंगाला चिटकत आहेत.त्यामुळे सोनार हे चांगलेच चर्चेत आलेत.या घटनेचा मात्र त्यांना काहीही त्रास होत नाहीये,अस त्यांचं मत आहे. तर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं याबाबत घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

हा प्रकार कसा समोर आला
अरविंद सोनार यांनी 8 दिवसांपूर्वी लस घेतली होती. सोनार यांच्या मुलाने युट्युबवर दिल्लीच्या एका माणसाचा नाणी चिकटतात, असा एक व्हिडिओ बघितला. जयंत सोनार यानं कोरोना लसीचं दोन लस घेतलेल्या वडिलांच्या अंगाला स्टील लोखंड,नाणं चिकटवून बघितलं तर अगदी सहज चिटकल. रवींद्र सोनार यांनी सुरुवातीला घामामुळे असा प्रकार होत असावा म्हणून अंघोळ करुन पाहिलं. अंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा नाणी आणि चमचे शरीरावर चिकटतात की नाही हे तपासलं. यावेळी पुन्हा एकदा नाणी चिकटली.

Google Ad

जयंत सोनार यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला. तो व्हिडीओ दिल्लीमधील होता. संबंधित व्हिडीओमध्ये कोरोना लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला नाणे आणि इतर स्टीलच्या गोष्टी चिकटत असल्याचं बघितलं होतं. त्यामुळे त्यांनी व्हिडीओतील घटनेप्रमाणं नाणी वडिलांच्या अंगाला चिकटत असल्याचं समोर आलं आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मत काय?
नाशिकच्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र, ही घटना अंधश्रद्धेशी संबंधित नाही. यापूर्वी अनेक घटना अशा समोर आल्यात त्यामुळे घाबरून न जाता यावर तज्ज्ञ मंडळीने संशोधन करणं गरजेचं आहे, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिकचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं आहे.

टीप: कोरोनाची लस सुरक्षित आहे. या लसींना WHO आणि ICMR कडून परवानगी मिळाल्यानंतरच तिच्या वापराला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या घटनेंसंदर्भात कोरोना लसीसंदर्भात करण्यात आलेल्या दाव्याची पुष्टी ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ करत नाही. कोरोना लसीकरण करुन घ्यावं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!