महाराष्ट्र 14 न्यूज, दि .१२ नोव्हेंबर : महायुती आहे तर महाराष्ट्रात विकासाला गती आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील गुंतवणूक आणि विकासकामांबद्दल भाष्य केलं. त्यासह काँग्रेसनं खोटी आश्वासनं दिल्याचं म्हणत महायुतीला पुन्हा एकदा निवडून द्यावं, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत गैरमार्गातून कमावलेला पैसा काँग्रेसकडून वापरला जात आहे.काँग्रेसने कर्नाटकात घोटाळे केले असून त्या पैशांचा वापर निवडणुकीसाठी करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
विधानसभा २०२४ च्या निवडणुकीतील पुणे व सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या ३१ उमेदवारांच्या प्रचारार्थ स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, उदयनराजे भोसले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व महायुतीचे ३१ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून, ‘पुण्यातील लाडक्या बहिणींनो व भावांनो, माझा नमस्कार’ अशी मराठीतून भाषणाला सुरूवात करत मोदी यांनी त्यानंतर मात्र काँग्रेसवर तिखट शब्दांमध्ये हल्ला चढवला.
पंतप्रधान म्हणाले, “महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. पुण्यानं नेहमीच भाजपच्या विचारधारेचं समर्थन केलं आहे. येणारं महायुतीचं सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जलदगतीनं काम करणार आहे.”
▶️पुण्यात रिंगरोडसाठी साडे दहा हजार कोटी रूपये…
“स्वारगेटच्या मार्गावर मेट्रो चालू झाली आहे. स्वारगेट आणि कात्रज मेट्रो महामार्गाचं काम सुरू झालं आहे. पुण्यातील रिंगरोडसाठी साडे दहा हजार कोटी रूपये खर्च करण्यात येत आहेत. पुण्याला 21 व्या शतकातील वेल कनेक्टेड सिटी बनविण्यासाठी आम्ही काम करत आहोत,” असं मोदींनी सांगितलं.
▶️विदेशी कंपन्यांची पहिली पसंती, महाराष्ट्र…
“पुण्याला मजबूत करण्यासाठी गुंतवणूक, पायभूत सुविधा आणि उद्योगाची गरज आहे. आम्ही याच्या प्रत्येक घटकावर काम केलं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये देशात रेकॉर्डब्रेक विदेशी गुंतवणूक झाल्या आहेत. ज्याही विदेशी कंपन्या भारतात आल्या आहेत, त्यांची गुंतवणुकीसाठी पहिली पसंती महाराष्ट्राला आहे. पुणे आणि परिसरातही ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्या वाढल्या आहेत. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पुण्यातील मोटार उद्योग देशात डंका वाजवत आहे. पुण्याच्या कनेक्टिविटीसाठी महायुतीचं सरकार गंभीरतेने काम करत आहे,” असं मोदींनी म्हटलं.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…