महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२जून) : महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र निकालाची धूम पहायला मिळत आहे. अनेकांना दहावीच्या परिक्षेत चांगले नंबर मिळाले तर काहींना कमी नंबर मिळाले आहेत. गेल्या वर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे निकाल काही प्रमाणात कमी लागला होता.
पास झालेल्यांचे कौतुक जोरात सुरू आहे. पंरतु नापास किंवा कमी मार्क मिळालेल्यांनी ताणतणाव घेऊ नये. आपल कसं होणार? या ताणातून बिल्कुल चुकीच पाऊल उचलू नका.
एकच करा – लता मंगेशकर ही भारतरत्न गायिका फक्त दुसरी पर्यंत शिक्षण झालेलं होतं
— माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील फक्त 7 वी पर्यंत शिक्षण झालेलं होतं,महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री होते.
–सैराट चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेले दिग्दर्शक नागनाथ मंजुळे फक्त 10 वी नापास झालेत.
पंरतु कोणालाही एवढ यश मिळणार नाही तेवढं त्यांना मिळालेलं आहे की त्यांचे नाव मान्यवर दिग्दर्शिकांमध्ये घेतलं जात. आपल्या आसपास आपले जवळचे मित्र, मोठमोठे व्यावसायिक, राजकारणी मंडळी खूप कमी शिक्षण असूनसुद्धा आयुष्यात यशस्वी झालेली आपण पाहत आहोत.
असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांना या दहावीच्या परिक्षेत अपयश आलं आहे. मात्र यानं खचून जाऊ नका, धीर सोडू नका. असे अनेक लोक आहेत ज्यांनी दहावीत कमी नंबर मिळाले तरीही आज ते चांगल्या पोस्टवर कामाला आहे. अशाच काही यशस्वी ची यशोगाधा तुम्हाला सांगणार आहोत ज्यांना दहावीत कमी नंबर मिळाले., तरी ही…
तरीही त्यांनी हार न मानता जिद्दीने यश संपादन केलं. या IPS अधिकाऱ्याचं नाव अवनीश शरण आहे. अवनीश हे एकदा नव्हे तर 13 वेळा नापास झाले. यानंतरही त्यांनी हिंमत हारली नाही.
दहावीच्या परीक्षेतही त्यांना केवळ 44 टक्के गुण मिळाले होते. पण आपल्या मेहनत आणि जिद्दीने त्यांनी शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याचे जे स्वप्न असते ते साध्य केलं. दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी पास करून आयएएस अधिकारी होण्यात यश मिळवलं. आयएएस अवनीश शरणने ट्विट करत त्यांच्या निकालाविषयी सांगितलं.
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की, ते किती वेळा आणि कोणत्या परीक्षेत नापास झाले. त्यांनी हे ट्विट करताच व्हायरल झालं आहे. लोकांना आयएएस अधिकाऱ्याचे ट्विट खूप प्रेरणादायी वाटत आहे. IAS अवनीश शरणने सांगितले की, ते 13 वेळा नापास झाले होते.
अवनीश यांना 10वीच्या परीक्षेत 44.7 टक्के गुण मिळाले होते. यानंतर त्यांना 12वीमध्ये 65 टक्के आणि 12 वीमध्ये 60 टक्के गुण मिळासे. यानंतर ते सीडीएस आणि सीपीएफमध्ये नापास झाले.
त्याचवेळी राज्य लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेत ते 10 पेक्षा जास्त वेळा नापास झाले होते. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली. दरम्यान, त्यामुळे दहावीच्या परिक्षेत तुम्हालाही कमी मार्क मिळाले असतील किंवा तुम्ही अपयशी झाला असाल तर खचून जावू नका. जिद्दीने आणि मेहनतीने पुन्हा प्रयत्न करा. शेवटी तुम्हाला यश हे मिळेलच.
तर, आज दहावीचा निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर नागराज मंजुळे यांचे दहावीच्या निकालपत्राची एक कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये नागराज मंजुळे दाहावीत नापास झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात मोठ्या अक्षरात त्याच्यावर फेल (FAIL) असं लिहिलं आहे. ही गुणपत्रिका आज व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शनात अव्वल असलेले नागराज मंजुळे अभ्यासाच्या बाबतीत फारच कच्चे होते.
सध्याएका मुलाखतीमध्ये देखील नागराज यांनी दहावीत ते नापास झाल्याचे सांगितले होते. पण निराश न होता मी दोनदा दहावीची परीक्षा दिल्यानंतर उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले होते.
काही दिवसापूर्वी नागराज मंजुळे यांनीच त्यांची दहावीची गुणपत्रिका सोशल मीडियावर शेअर केली होती.
शेअर केलेल्या गुणपत्रिकेमध्ये त्यांनी दहावीला 38.28 टक्के गुण होते. म्हणजे 700 पैकी 268 इतके मार्क्स त्यांना मिळाले होते. 2018 मध्ये महाराष्ट्रा बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार होता त्यावेळी त्यांनी तो निकाल पुन्हा शेअर केला होता. विशेष म्हणजे अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ही गुणपत्रिका शेअर केली होती.
या पोस्टमध्ये नागराज यांनी म्हटलं होतं की, “मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर.मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस., सी. , यु. पी. एस. सी.. परीक्षा कुठलीही असो ती अंतिम कधीच नसते. यशापयशात. असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही.”, अशी पोस्ट नागराज मंजुळे यांनी शेअर केली होती.
शिवाय कमी मार्कस मिळाले म्हणून निराश होऊ नका असा सल्ल देखील त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिला होता. त्यांनी दहावीत नापास झाल्याचे एका मुलखतीमध्ये सांगत म्हटलं होतं की, अरे मित्रांनो, निराश कसलं होतायं. जरा माझ्याकडं बघा. सोलापूरमधील करमाळासारख्या गावात माझं बालपण गेले.
तिथंच वाढलो, तिथंच जगलो. तेही अगदी मनसोक्त. पुढं माझं कसं होईल, मी काय करेन कशाचा काहीच पत्ता नव्हता. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल मी दहावीत एकदा नव्हे, तर दोनदा नापास झालो.
निकाल लागल्यानंतर मी चेहरा काहीसा पाडून येत असताना रस्त्यात वडील भेटले. त्यांनी ‘काय झालं?’ असं विचारलं, तेव्हा त्यांना मी दोन विषय राहिले सांगितले. वडील अडाणी होते. ते मला मुळीच रागावले नाहीत.
उलट परत देता येईल ना, असे म्हणाले आणि मी दोनदा दहावीची परीक्षा दिल्यानंतर उत्तीर्ण झालो. माझ्यावर आई-वडिलांनी कधी ओझं लादलं नाही आणि मीही कधी ते घेतलं नाही. मी स्वत:ला सिद्ध करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. कारण एखादी परीक्षा कुणाला नापास ठरवू शकत नाही.