Google Ad
Editor Choice Maharashtra

Nagpur : नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात भाजप नगरसेवकानेच राडारोडा करीत केली तोडफोड!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६मे) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त कोणतेही पोस्टर, बॅनर लावू नये आणि तामझाम करू नये. उलट त्यावर होणाऱ्या खर्चातून रक्तदान, कोरोना तपासणी शिबिरे घ्यावी, असे सांगितले होते. पूर्व नागपुरातील सतनामीनगर येथे काल मंगळवारी आरटीपीसीआर चाचणी शिबिर घेण्यात आले. मात्र सत्ताधारी भाजपचे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी संताप व्यक्त केला व तोडफोड केली.

पूर्व नागपुरातील सतनामीनगर येथे आयोजित केलेल्या आरटीपीसीआर चाचणी शिबिरात सत्ताधारी भाजपचे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी मंगळवारी संताप व्यक्त केला, तर त्यांच्या समर्थकांनी राडा करीत तोडफोड केली. आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती आटोक्यात आली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपने लोककल्याणकारी उपक्रम सुरू केले आहे. कोरोनामुळे भाजपने शहरात रक्तदान, कोरोना चाचणी, प्लाझ्मा दान शिबिर इत्यादींचे आयोजन केले आहे.

Google Ad

मंगळवारी भाजपचे पूर्व नागपूर सचिव नामदेव ठाकरे यांनी सतनामीनगर येथे कोविड चाचणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामधील लोकांचे नमुने गोळा करण्यासाठी दोन मोबाईल बसची सुविधा होती. यासंदर्भात ठाकरे यांनी बॅनरही लावले होते. सकाळी दहा वाजताच्या सुमारास प्रभागाचे भाजपचे नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी शिबिर घेण्यात येत असल्याची माहिती न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केला. बोरकर आणि त्यांच्या समर्थकांनी छावणीची तोडफोड केल्याचा आरोप आहे.

ठाकरे यांनी बोरकर यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि स्थानिक आमदार खोपडे यांनाही माहिती दिली. खोपडे यांच्या मध्यस्थीमुळे तणाव निवळला. लकडगंज झोनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी भैसारे यांनी अशा कोणत्याही घटनेची माहिती नसल्याचे सांगितले. बोरकर म्हणाले, या शिबिराशी काही संबंध नसल्याचे सांगितले. परंतु आयोजकांनी प्रभागात कार्यक्रम करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

नगरसेवक बाल्या बोरकर यांची काहीही नाराजी असली तरी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित शिबिरात असे करणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया या घटनेनंतर व्यक्त करण्यात येत होत्या. भारतीय जनता पक्ष एक शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो आणि पक्षाच्याच पदाधिकाऱ्याने घेतलेल्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आल्यामुळे तपासणीसाठी आलेल्या लोकांनी नाराजी व्यक्त केली. आमदार कृष्णा खोपडे यांनी वेळीच यशस्वी मध्यस्थी केल्यामुळे प्रकरणाने गंभीर वळण घेतले नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!