Google Ad
Editor Choice Pune

माय पुणे सेफ’ ॲप आणि बदली सॉफ्टवेअरचे निर्मिती वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी … वैशिष्टयं काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११जून) : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच शहरात घडलेल्या घटनांची माहिती तात्काळ  मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘माय पुणे सेफ’ ॲपची निर्मिती केली आहे. तसेच पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासकीयदृष्टया पण पारदर्शकपणे मनासारखी बदली होण्यासाठी बदली सॉफ्टवेअरही सुरु करण्यात आले आहे.

नुकतंच या दोन्हीचे उद्धाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ‘माय पुणे सेफ’ ॲप आणि बदली सॉफ्टवेअरचे निर्मिती पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

Google Ad

माय पुणे सेफ ॲपची काही वैशिष्टयं
🟢पुणे शहरातील नागरिकांसाठी तसेच कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीसांची तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पुणे शहरातील पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून दैनिक गस्तीसाठी “माय सेफ पुणे” ॲप तयार करण्यात आले आहे.
🟢या ॲपच्या सहाय्याने पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान एखाद्या घडणाऱ्या गुन्हयास प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.
🟢तसेच एखाद्या  महत्वाचे ठिकाणी भेटी देवून किंवा कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी भेट देवून त्या ठिकाणी सेल्फी फोटो काढून माय सेफ पुणे ॲपमध्ये अपलोड करता येणार आहे.

🟢यामुळे त्या घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश व वेळ नोंद केली जाईल.
🟢या ॲपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांना सदरचे बिट मार्शल कोणत्या भागामध्ये गस्तीवर आहे याची माहिती मिळते.
🟢बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती कायमस्वरुपी ॲप मध्ये उपलब्ध राहते.

🟢हे ॲप परिमंडळ चारचे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.

बदली सॉफ्टवेअरबद्दल माहिती
बदली सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासकीयदृष्टया पण पारदर्शकपणे मनासारखी बदली मिळण्यास मदत होणार आहे. या ॲपमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, त्यांचा कार्यकाळ इत्यादी बाबीची नोंद असणार आहे. पोलीस स्थानकामध्ये समान पोलीस कर्मचाऱ्याचे बदलीने वाटप करण्यास मदत होणार आहे. यावेळी या सॉफ्टवेटरचे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सादरीकरण करुन कार्यपध्दतीबाबतची माहिती दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!