Google Ad
Articles Health & Fitness Technology

माझं आरोग्य : मूतखड्यावर रामबाण उपाय सापडला … शरीरातच नष्ट होणार खडा!

महाराष्ट्र 14 न्यूज : ( माझं आरोग्य ) मुतखड्याचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो. वेळीच त्याचा धोका ओळखता आला नाही तर दिवसेंदिवस त्रास वाढतो. मुतखड्याचा आकार वाढल्यानंतर शस्त्रक्रियेने तो बाहेर काढावा लागतो. मात्र आता मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांसाठी दिलासा मिळणार आहे.

मुतखड्याच्या आजारावर आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने प्रभावी औषध शोधल्याचा दावा केलाय.. या औषधाला मान्यताही मिळाली असून अशा प्रकारचं औषध बनवणारं नांदेडचं विद्यापीठ राज्यातलं पहिलंच विद्यापीठ ठरलंय.

Google Ad

मूतखड्यावर प्रभावी औषध :-
मुतखडा शरीरातच कसा नष्ट करता येईल यासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाने संशोधन सुरु केलं… स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ जैवशास्त्र संकुल, औषधी वनस्पती आणि भुमी औषधनिर्मिती कंपनी वसमत तसेच कलस औषध निर्मिती कंपनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा संशोधन प्रकल्प राबवला गेला… १० वर्षे त्यावर संशोधन करण्यात आले… प्रयोगशाळेतील उंदरांवर आणि त्यानंतर १०० रुग्णांवर औषधाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला… अन्न औषध प्रशानाची परवानगी तसेच भारत सरकारकडून त्याचे पेटेंट घेण्यात आले… आता डिसोकॅल नावाने अतिशय माफक दरात ही औषधी बाजारात आणली जात आहेत.

विद्यापिठांमध्ये अनेक विषयांवर तज्ञ प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी संशोधन करतात. त्याचा फायदा समाज हितासाठी होणे अपेक्षित आहे… मुतखडा या अतिशय वेगाने वाढत चाललेल्या आजारावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाने प्रभावी औषध शोधले आणि त्याचा फायदा आता गरीब रुग्णांना होणार आहे.

डिसोकॅल औषध :-

डिसोकॅल हे औषध गोळ्यांच्या रुपात उपलब्ध करण्यात आले आहे. कमी पैश्यांमध्ये उपचार होणार असल्याने मुतखड्याच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाची टीप :- सदर उपाय हे ‘ त्याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा . ‘ महाराष्ट्र 14 न्यूज ‘ कोणत्याही उपायांच्या परिणामांची जबाबदारी घेत नाही . व्यक्तीपरत्वे उपायांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

151 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!