Google Ad
Food & Drinks Health & Fitness

माझं आरोग्य : ( भोजन कुतूहल ) आहार म्हणजे काय? आहार कसा असावा …

महाराष्ट्र 14 न्यूज : ( माझं आरोग्य ) भोजन कुतूहल – आहार म्हणजे काय? आहार कसा असावा …

आयुर्वेद मुळात स्वास्थ्यावर आधी भर देतो म्हणून आहार प्राधान्य आयुर्वेद मानतो नंतर औषध चिकित्सा येते.आहार म्हणजे काय ? असे विचारले की आधी उदरभरण हाच विचार करतो . पण म्हणतात ना ‘ उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ‘ अगदी खरंय हे यज्ञ कर्म च आहे.यज्ञ म्हणजे अभिष्ट सिध्दी , इष्ट ची पूर्ती आणि पर्यायाने समुदायाचे योगक्षेम साधणे . म्हणूनच आहार सेवन सुध्दा यज्ञ मानला गेला आहे . आयुर्वेदाने मात्र शरीर भरणा सोबत मानसिक भरणा साठी आहार सांगितला आहे . आणि या दोहोंच्या यज्ञ कर्मानेच सामजिक स्वास्थ्य आणि योगक्षेम साधला जातो .

Google Ad

आयुर्वेदाने आहाराचे काही नियम दिले आहेत.उदाहरणार्थ गरम जेवण , स्निग्ध जेवणे , भूक लागल्यावरच जेवणे , मात्रेत च आहार घेणे , न बोलता , न हसता , मन लावून पाचही बोटांचा वापर करून आहार सेवन करायला हवा . अगदी सूक्ष्म कल्पनेवर विचार करूनच आयुर्वेदाने आहार सेवन विधी वर्णन केली आहे . सुरवातीला मधुर रसाचे सेवन ( हो हो इथे ends with dessert नाही बरं का !! ) बहुतांशी घरात जेवणा आधी अगदी छोट्या मात्रेत गुळ तूप , साखर तूप किंवा आजच्या नैवेद्यात छोटा पुरणाचा गोळा आणि तूप खाऊनच जेवणाला सुरवात होते.नंतर भात वरण भाजी पोळी मिष्टान्न आणि त्याला चवीची जोड म्हणून अम्ल लवण रसाचे चटणी , कोशिंबीर , पापड आणि शेवटी कषाय रसाचे ताकाकिती सखोल विचार आणि तेही आपल्या पचन क्रियेच्या टप्प्या नुसार .

मग निरामय जीवन का नसेल बरापण हेच डावे जेव्हा उजव्यात येतात तेव्हा मात्र शरीराची पायमल्ली सुरू होते.चटणी पोळी , लोणचं पोळी , फक्त कोशिंबीर खाणे , भात नकोच बाई , हो हल्ली मी ना ग्लूटेन फ्री डाएट घेते म्हणून पोळी वगैरे नकोच मला , तर kitto डाएट नुसार पनीर बदाम दूध असे आपल्या ऋतूनुसार व प्रकृती नुसार न पचणारा आहार घेणे या मुळे अभिष्ट वजन कमी होत नाहीच पण इष्ट आरोग्य हि खालावते आणि पर्यायाने सामाजिक योगक्षेम किंवा शारीरिक योगक्षेम साधत नाही.आणि विविध आजारांना तोंड द्यावे लागते.

मुळात जेवण कमी किंवा वाटेल तसे खाऊन suppliments च्या कुबड्या घेऊन जगायचेच कशाला ? का हवा आहे एवढा खटाटोप ? सगळं खा पण मात्रेत , बारीक चाऊन खा , शांत चित ठेवून खा ( समोर मोबाईल , टीव्ही कॉम्प्युटर अशी व्यवधाने नकोत ) , आणि मस्त मांडी घालून ( हो हो मांडी घालून उगीच टेबल खुर्ची वर वृद्ध असल्यासारखे नकोच ) जेवा.जेवढी भूक त्याच्या तीन भागच खा , नियमित वेळेत आणि दोनच वेळा जेवा मग का नाही शरीर बांधा सुव्यवस्थित राहणार आणि प्रतिकार क्षमता वाढेल हे वेगळच . नाही का ?

हाच शरीरासाठी घेतलेला आहार , सात्विक राजसिक आणि तामसिक गटात मोडतो.आणि नीट पाहिलं तर या पद्घतीने घेतलेला आहार तुमच्या मनावर प्रभाव टाकत असतो .आपली मानसिक घडण , विचार , वागणूक आणि आपली देहबोली यावरून आपल्या आहाराचा अंदाज येतो.आयुर्वेदाने शरीर बृहणा साठी आहार नियम दिलेले आहेतच पण मानसिक बृहणासाठी सुध्दा आहार सांगितला आहे पण त्यासोबत विहार ही सांगितला आहे.अगदी सूक्ष्म विचार वर्णन केले आहे.पण मी तुम्हाला अगदी सामान्य भाषेत सांगणार आहे .

जशी आहाराची सुरवात मधुर रसाने होते तशीच मानसिक आहारात सुध्दा सकारात्मकतेचा मधुर रस हवा.कदाचित म्हणूनच जेवणाआधी सगळ्याच धर्मात प्रार्थना म्हटली जाते.आणि आपण सगळे जाणतात च की सकारात्मक विचार आपल्या endocrine system आणि DNA वर किती काम करतात , त्यावर आज जगात किती संशोधन सुरू आहे जे आपल्या शास्त्रात काही हजार वर्षांपूर्वी च मांडून ठेवले आहे . त्यामुळे आपले इष्ट साध्य होताना दिसते.मग अशी सकारात्मकतेची पोळी , आनंदाची भाजी , समाधानाची खीर , कृतज्ञतेचा भात , आणि आशेची आमटी खाताना अत्यल्प क्रोधाची चटणी , मत्सराचे लोणचे , मदाची कोशिंबीर आणि मोहाचा पापड असावा.त्याचा वापर फक्त जसे आहारात जठराग्नी वृद्धिं साठी असतो तसा मानसाग्नी वृद्धि साठी असावा ( हा शब्द शास्त्रीय नाही बरं का )

अजूनही बऱ्याच घरातून जेवताना चित्राहुती काढली जाते , पंच महाभूतांसाठी किंवा किड्या मुंग्यांसाठी थोडक्यात भूतदया तशीच मानसिक आहाराची चित्राहुती काढतांना आपला राग द्वेष असूया मत्सर आणि लोभ ची आहुती देऊन अन्न ग्रहण करावे . ही चित्राहुती सामाजिक योगक्षेम साधण्यासाठी योग्य यज्ञ होईल नाही का ? आहार शरीरासाठी असो की मनासाठी , डाव्याचे उजवीकडे गेले आणि उजवीचे डाव्याकडे आले तर शरीराचे भरण पोषण होणार नाही आणि ” आमय ” जन्म घेतो तसेच मनाचेही पोषण झाले नाही तर ” निराशावाद ” जन्मास येतो आणि ” आतङ्क ” पसरतो . ( आमय , आतङ्क हे व्याधी चे पर्यायी नावे आहेत ) मग या डाव्या उजव्याचा फरक इतरत्र कुठेही न करता जर इथे केला तर ” भोजन कुतूहल ” भोजन क्षेम ” होईल नाही का ?????

वैद्या सुजाता बाऊस्कर ( MD Ayurved )

Google Ad

About the author

Maharashtra14 News

53 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!