Google Ad
Editor Choice Maharashtra

🍃 माझं आरोग्य : अनेक आजारांवर गुणकारी औषध ‘ओव्याचे पाणी ‘

महाराष्ट्र 14 न्यूज : ( माझं आरोग्य ) अनेक आजारांवर गुणकारी औषध ‘ओव्याचे पाणी :-

किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. कारण ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात. आज ओव्याने होणाऱ्या काही फायदेशीर गोष्टींवर नजर टाकुयात…

Google Ad

▪ सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. हे पाणी नियमित प्यायल्यास डायबिटीजचा धोका कमी होतो.

▪ हृदयासंबंधित अनेक आजारांवर ओव्याचे पाणी फायदेशीर आहे.

▪ दररोज सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्यास दातांचे दुखणे तसेच तोंडाचा वास दूर होतो.

▪ पोट दुखत असल्यास अथवा अपचनाचा त्रास जाणवल्यास ओव्याचे पाणी प्या.

▪ ओव्याचे पाणी नियमित घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे वजन घटवण्यासही मदत होते.

▪ सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होतो. तसेच अस्थमासारख्या आजाराचा धोकाही टळतो.

▪ तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास ओव्याच्या पाण्यामध्ये एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे.

▪ तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतत जाणवत असेल तर ओव्याचे पाणी प्यायल्याने आराम पडतो.

▪ पोटात जंतू झाल्यास ओव्याच्या पाण्यात एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे. जंताचा त्रास दूर होईल.

▪ निद्रानाश झाल्यास झोपण्याआधी एक कप ओव्याचे पाणी पिऊन झोपा. यामुळे झोप चांगली येते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!