Categories: Editor Choice

मुस्लिम बांधवांची आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना (दुवा)

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ एप्रिल) : आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडण झाली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याने परिसराला धर्मनिरपेक्ष विचारांचा वारसा लाभलेला आहे.

धर्म कुठलाही असो तो माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतो.या माणूसपणाच्या प्रवासात असे मिलवर्तनाचे क्षण येतात जे केवळ इव्हेंट म्हणून नव्हे तर एक मानवतेच्या या हारामध्ये फुल म्हणून गोवता येतात आणि याचा सुगंध साऱ्या समाजाला सुगंधित करतो. हेच कार्य लक्ष्मणभाऊ जगताप यांनी केले. मुस्लिम समाजातील नागरिकांनीही तो वसा जपला, आणि आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी पवित्र अशा रमजान महिन्यातील शुक्रवारी नमाज पठनाच्यावेळी दापोडी आणि पिंपळे गुरव मशिदीत प्रार्थना (दुवा) केली.

यावेळी मोठया प्रमाणावर मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते. आमच्यासारख्या हजारो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे आमचे भाऊ हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक योद्धा असून त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा व ते पुन्हा एकदा जनसेवेसाठी सज्ज व्हावेत, अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांकडून यावेळी करण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, दापोडी या भागात अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लीम समाज एकोप्याने व बंधुभावाने राहत असून पिढ्यान पिढ्या एकमेकांना सुख दु:खात साथ देत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago