दिड वर्षापुर्वीच्या खुनाच्या गुन्हयाची उकल, आरोपींना ठोकल्या बिहार मधुन बेड्या … पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा , युनिट १ ची कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरा मधिल चिंचवड पोलिस स्टेशनच्या हददीत १२.०२.२०२१ रोजी एक २० ते २५ वर्षांचे इसमाचा गळा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आला होता . गुन्हा दाखल झाल्यानंतर दिड वर्ष झाले तरी पोलीसांना मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलीसांसमोर आरोपींना शोधुन अटक करण्याचे मोठे आव्हान होते . गुन्हे शाखा , युनिट -१ यांनी हे अव्हान स्विकारुन भोसरी एमआयडीसी व चिखली परीसरातील सर्व कंपन्या चेक करण्याचे ठरवले होते .

सुमारे ३०० कंपन्या चेक केल्यानंतर त्यांना दलने इंडस्ट्रीज प्रा.लि. सेक्टर क्र . ७ , प्लॉट क्र . १ ९ ४ , भोसरी , पुणे या कंपनीमधील एक कामगार दि .११.०२.२०२१ पासुन कामावर गैरहजर असल्याची माहिती मिळाली . सदर कंपनीचे मालक स्वप्नील सुरेश दलने याना एमआयडीसी तसेच चिंचवड पोलीस स्टेशनला दाखल असणा – या उघडकीस न आलेल्या मर्डरच्या गुन्हयातील मयत इसमाचे फ़ोटो दाखविण्यात आले असता त्यांनी त्यापैकी एक फ़ोटो हा त्याच्याकडे कामास असणारा व ११ फ़ेब्रुवारी २०२१ पासुन बेपत्ता असलेल्या राकेशकुमार या इसमाचा असल्याचे पाहुन ओळखले .

सदरबाबत चिंचवड पोलीस स्टेशन गु.र.क्र .३८ / २०२१ कलम ३०२,२०१,३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल असल्याने अधिक माहिती घेता त्यांनी मयत इसम राकेशकुमार याचा मोबाईल फ़ोन नंबर दिला होता .

अशा प्रकाराने मयत इसमाची ओळख पटविण्यात युनिट -१ विभागास यश मिळालेले होते . मयताची ओळख पटली तरी आरोपी पर्यन्त पोहचणे अवघड वाटत असताना सदरच्या पथकाने तात्रीक तपास करुन मुख्य आरोपी रत्नेशकुमार रमाकांत रॉय , २ ) सुबोध अखिंदर प्रसाद कुशवाह , रा . मधुआहा , पो . तितरिया , पोलीस स्टेशन रजेपुर , जि . पुर्व चंपारण्य , बिहार असे आरोपी निष्पन्न केले . त्याच्या शोधार्थ तपास पथके बंगलोर व कर्नाटक येथे रवाना केलेली होती .७ दिवस तितरीया , पुर्व चंपारण्य , बिहार या ठिकाणी थांबुन कधी गुप्त बातमीदार वापरुन तर कधी वेशांतर करुन तसेच स्थानिक पोलीसांची मदत घेऊन त्यांनी आरोपी नामे सुबोधकुमार अकिदर प्रसाद कुशवाह , यास शिताफीने अटक करण्यात यश मिळविले . त्यास पुण्यास अणुन अणिक तपास केला असता त्याचा साथीदार रत्नेश समाकांत रॉय याच्या मदतीने सदर खून केला आसल्याची कबुली दिली आहे . अशाप्रकाराने दिड वर्षेच्या अथक परिश्रमाने सदर गुन्हयाच्या अवाहानात्मक गुनहा उघडकीस अनल्याने तपास पथकाचे अभिनंदन केले आहे .सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा.श्री अंकुश शिदे सो , अपर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे सो . , पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) डॉ . काकासाहेब डोळे सो . सहायक पोलीस आयुक्त डॉ . प्रशांत अमृतकर सो . यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर , सहायक पोलीस निरीक्षक कैलासे , पोलीस उप निरीक्षक भांगे , पोलीस अंमलदार फारूख मुल्ला , सोमनाथ बो – हाडे , महादेव जावळे , अमित खानविलकर , सचिन मोरे , मनोजकुमार कमले , गणेश महाडीक , बाळू कोकाटे , प्रमोद गर्जे , मारुती जायभाय , प्रमोद हिरळकर यांचे पथकाने केली आहे .

तांत्रिक विश्लेषण हे तांत्रिक शाखेचे पोलीस हवालदार माळी यांनी करुन तपास पथकास विषेश सहकार्य केलेले आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago