महाराष्ट्र व14 न्यूज, दि.२५ नोव्हेंबर २०२३ : आधुनिक भारतातील समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली, आपल्या पत्नी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन समाजाला शिकविण्यासाठी बळ दिले आणि पहिली शिक्षिका होण्याचा मान दिला. त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी त्यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त २८ नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तदनंतर पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानात या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते सकाळी १०.१५ वाजता संपन्न होणार आहे.
सकाळी १०.३० वाजता अभिनेते सोमनाथ मुटकुळे यांचा क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘’क्रांतीज्योती सावित्री’’ हा एकपात्री नाट्यप्रयोग होणार आहे. दुपारी १२ वाजता शाहीर बापू पवार पोवाड्यांचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर १.३० वाजता साधना मेश्राम यांचा संगीतमय गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर दुपारी ३.३० वाजता ‘’महात्मा फुले आणि समाजप्रबोधनाची चळवळ’’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख तसेच विचारवंत गंगाधर बनबरे, साहित्यिक जावेद पाशा, डॉ. प्रदीप आवटे आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे प्राध्यापक दिलीप चव्हाण व इतर मान्यवरांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध लोककलावंत मीरा उमाप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘’प्रबोधनात्मक सांस्कृतिक जलसा’’ होणार असून संध्याकाळी ७ वाजता क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले लिखित ‘’तृतीय रत्न’’ या नाटकाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सिनेअभिनेते व गायक अनिरूद्ध वनकर हे या नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.
तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…
महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५ :* जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव…