Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट … ४० मिनिटात काय झाली असावी चर्चा?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२६मे) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बंद खोलीत बैठक झाली. आज सायंकाळी शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. या दोन नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे बैठक झाली. गेले काही दिवस शरद पवार हे आजारी होते. आज बऱ्याच दिवसांनी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

शरद पवार हे सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यामध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याची माहिती समजू शकली नाही. परंतु या बैठकीत राज्यातील चालू राजकीय घडामोडी तसेच केंद्राकडून राज्याला कोरोना संसर्गाच्या काळात मिळणारी तोकडी मदत यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Google Ad

शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास 40 मिनिटे बैठक झाली. सायंकाळी 5.30 ते 6.10 वाजेपर्यंत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. राज्यातील एकूणच कोरोना संसर्गाची परिस्थिती, राजकीय घडामोडी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चार्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. बैठकीच्या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु मराठा समाजाला विश्वासात कसं घ्यायचं या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!