Mumbai : राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये १८ जानेवारीपर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्तासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने केला खुलासा!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये 18 जानेवारीपर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्तासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने खुलासा केला आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ‘रविवारी आणि सोमवारी लसीकरणाबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे ते रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार पुढील आठवड्यात चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येईल,’ असं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

लसीकरण रद्द करण्याचं नेमकं वृत्त काय होतं?

कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक 17 आणि 18 जानेवारी असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड 19 लसीकरण मोहिमेची आज (दिनांक 16जानेवारी 2021) अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोवीन ॲपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत,’ असं वृत्त समोर आलं होतं. मात्र लसीकरण स्थगितीच्या वृत्तात तथ्य नसल्याचं आता आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

5 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

12 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

2 days ago