Google Ad
Agriculture News Maharashtra

Mumbai : शेतकऱ्यांचा केंद्र सरकारविरुद्ध एल्गार … पोलिसांनी मेट्रो चौकात शेतकरी मोर्चा अडवला … तर राज्यपाल गोव्याला

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्राने केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यांपासून आंदोलन छेडलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने जमा झाले आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनीही पाठिंबा दिलेला आहे. शेतकरी मोर्चा राजभवनाकडे जात असताना मेट्रो चौकात पोलिसांनी मोर्चा थांबविला आहे. त्यामुळे भाई जगताप, मेधा पाटकर, सचिन सावंत, नसीम खान, अशोक ढवळे, अशा २३ जणांचे शिष्टमंडळ पोलिस व्हॅनमधून राजभवनाकडे रवाना होत आहे.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी राज्यपालांच्या अनुपस्थितीवर टिकेची झोड उठवली आहे. राज्यपाल जोपर्यंत आम्हाला वेळ देत नाहीत, तोपर्यंत आम्ही चौकात ठिय्या मांडून राहणार आहे”, अशी आक्रमक भूमिका शेतकरी नेते अजित नवले यांनी मांडली आहे. “भगतसिंग कोश्यारी हे पळपुटे राज्यपाल आहेत”, असे मत काॅंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी व्यक्त केले. सचिन सांवत म्हणाले की, “हा काळा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी मोर्चा मागे हटणार नाही.

Google Ad

जो बोले सो निहाल, या घोषणेसोबत हर हर महादेव म्हणत महाराष्ट्राचा शेतकरी असणार आहे”, अशी प्रतिक्रिया काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. अजित नवले म्हणाले की, “राज्यपाल पळून गेले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर भाजपने गद्दारी केलेली आहे. राज्यपाल नसल्यामुळे आम्ही राजभवनावर जाणार नाही”, नवले यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे.

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. हा मोर्चा शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!