Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : या पुढे दिसणार मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात भाजप पक्षाचे झेंडे … काय म्हणाले, चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र 14 न्यूज : मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा असेल व पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यामध्ये संपूर्ण ताकदीने सहभागी होतील, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबई येथे केली. मराठा आरक्षणासाठी आपल्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील भाजपाच्या समितीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आशिष शेलार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. समितीची पहिली बैठक रविवारी मुंबईत झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मा. चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य तसेच प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते

Google Ad

यावेळी, चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण देण्यात आले होते. हायकोर्टातही हे आरक्षण टिकवले होते आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळवू दिली नाही. पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला. मुडदा पाडला. माती केली, अशी टीका चंद्रकात पाटील यांनी केली.

मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात भाजप पक्षाचे झेंडे;
याचबरोबर, मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहोत. या आंदोलनात आमचा झेंडा राहील. पण पक्षाचे नाव राहणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगतिले. तसेच, मराठा आरक्षणासाठी आम्हीही कायदेतज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार आहोत. ही समिती मराठा आरक्षणात राज्य सरकार कुठे कमी पडले याची पोलखोल करण्याचे काम करेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. याशिवाय, मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याने राज्यानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!