Mumbai : २०२० ची आणखी एक वाईट बातमी .. संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग , उपचारांसाठी परदेशी जाण्याची शक्यता ..

महाराष्ट्र 14 न्यूज : अभिनेता संजय दत्त फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्याला झालेला फुफ्फुसाचा कर्करोग हा तिसऱ्या टप्प्यातील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्त आज अमेरिकेत उपचारासाठी जाणार आहे. अलिकडेच त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा चाचणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला होता. दोन दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर सोमवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता

संजय दत्तने मंगळवारी एक पोस्ट शेअर केली होती. ‘माझ्या मित्रांनो, वैद्यकीय उपचारासाठी मी काही दिवसांपासून माझ्या कामावरुन ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब आणि माझे मित्र माझ्याबरोबर आहेत. मी माझ्या हितचिंतकांना विनंती करतो की तुम्ही अजिबात काळजी करु नये आणि अनावश्यक निष्कर्ष काढू नका. आपल्या प्रेम आणि शुभेच्छा, मी लवकरच परत येईन.

फिल्म ट्रेड अनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करत ही महिती दिली. काही दिवसापूर्वी संजय दत्ताला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नाहटा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. त्याची प्रकृती वेगाने सुधरावी यासाठी आपण प्रार्थना करुयात.

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्याचा अहवाल नेगेटिव्ह आला होता. आवश्यक उपचारानंतर संजय दत्तला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

4 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

11 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago