Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता

महाराष्ट्र 14 न्यूज : महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता
महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढवले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) अॅक्ट २०२० आणि स्पेशल कोर्ट अॅड मशिनरी फॉर इंम्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ २०२० अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येतील.

Google Ad

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा केला आहे. या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या दृष्टीने दिशा कायदा समजून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह तत्कालीन अ.मु.स. (गृह) संजय कुमार आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आंध्रप्रदेशला भेट दिली होती.

आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याचा अभ्यास करुन महाराष्ट्रासाठी विधेयकाचा मसुदा करण्याकरिता अश्वथी दोरजे, संचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या उपरोक्तप्रमाणे दोन विधेयकांचे मसुदे मंत्रिमंडळासमोर १२ मार्च २०२० रोजी ठेवण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकांची सखोल तपासणी करुन विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार, मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीत गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश होता.
प्रस्तावित कायद्यांची ठळक वैशिष्ट्ये:
नवीन गुन्हे परिभाषित केले आहेत

समाज माध्यमांमधून महिलांना धमकावणे व बदनामी करणे.

बलात्कार, विनयभंग आणि अॅसिड हल्ला याबाबत खोटी तक्रार करणे

समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे.

एखाद्या लोकसेवकाने तपासकार्यात सहकार्य न करणे.

बलात्कार पीडितेचे नाव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि अॅसिड हल्ला याबाबत लागू करणे.

शिक्षेचे प्रमाण वाढविले

बलात्कार, अॅसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे.

शिक्षेचा कालावधी वाढवला आहे.

अॅसिड हल्ला प्रकरणी दंडाची तरतूद केली असून ती रक्कम पीडितेला वैद्यकीय उपचार व प्लास्टिक सर्जरीकरिता देण्याचे प्रस्तावित आहे.

फौजदारी प्रक्रियेमध्ये बदल सुचवला आहे

तपासाचा कालावधी दोन महिन्यांवरुन १५ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे.

खटला चालवण्याचा कालावधी दोन महिन्यांवरुन ३० कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे.

अपिलाचा कालावधी सहा महिन्यांवरुन ४५ दिवसांचा केला आहे.

३६ अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.

प्रत्येक अनन्य विशेष न्यायालयासाठी विशेष शासकीय अभियोक्ता नेमण्याचे प्रस्तावित आहे.

प्रत्येक घटकामध्ये महिला व बालकांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी (जिल्हा अधिक्षक / आयुक्तालय) विशेष पोलीस पथक, ज्यामध्ये किमान एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल, नेमण्याचे प्रस्तावित आहे.

पीडितांना मदत व सहकार्य करण्यासाठी सेवाभावी संस्थांना अधिसूचित करण्याचे प्रस्तावित आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!