Google Ad
Editor Choice

थेरगाव येथील सौ . विजया दत्तात्रय देशमुख यांची अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न महिला आघाडी च्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील पवारनगर थेरगाव येथील सौ . विजया दत्तात्रय देशमुख यांची अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न महिला आघाडी च्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.

महिला करिता काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने तसेच आजपर्यंत मराठा समाजासाठी केलेले कार्य पाहून अध्यक्ष रणजित जगताप त्यांना नियुक्ती पत्र दिले. त्यांचा नियुक्तीचा पदाचा कालावधी दोन वर्षे राहील.

Google Ad

आपल्या कारकीर्दीमध्ये महिला च्या हक्कासाठी आणि प्रश्नासाठी सतत कार्यरत राहावे, आपल्या कार्यक्षेत्रात संघटनात्मक बांधणी करावी, आपल्या कार्याची दिशा महिलाच्या हिताची व संघटनेच्या चौकटीत राहून शिस्तबद्ध काम करणारी राहील ही अपेक्षा ठेवून रणजित जगताप यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना विजया देशमुख, म्हणाल्या माझ्या जिजाऊंच्या लेकींना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, तसेच मराठा समाजातील आरक्षणासारखे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करेल.  एकेकाळी सामर्थ्याच्या जोरावर दुर्मालांचे रक्षण करणारा मराठा समाज आज विद्यमान सामाजिक , राजकीय ,आर्थिक व्यवस्थेमध्ये कोंडीत सापडला आहे . त्यामुळे समाजास परिवर्तनवादी दिशा दाखवण्यासाठी चळवळीची गरज आहे .त्यासाठी समस्थ मराठा समाजाने संघटीत होऊन जुना परंपरागत वारसा जपत डोळसपणे पुढील पावले टाकणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या तसेच जिजाऊंच्या कार्याचा आदर्श सर्व पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या समाजबांधवांना घेऊन समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करेल.

अखिल भारतीय मराठा महासंघ ही सामाजिक संघटना १९८१ साली कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली.

मुलभूत संकल्पना

मराठा समाजाची शैक्षणिक , सामाजिक ,सांस्कृतिक ,आर्थिक , उन्नती व्हावी .त्याचबरोबर सामाजिक दबावगट निर्माण व्हावा ही मुलभूत संकल्पना मराठा महासंघाची आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!