महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ ऑगस्ट) : हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था,कराड ही भारत कार्यक्षेत्र संपूर्ण असलेली संस्था असून यांच्या तर्फे राज्यस्तरीय ‘सह्याद्री पुरस्कार २०२३’ कु.सुहास साहेबराव कुदळे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा पत्रकार भवन पुणे येथे दि.२० ऑगस्ट २०२३ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. श्रीपाल सबनीस (मा.अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन) तसेच आमदार रविंद्र धंगेकर (कसबा विधानसभा पुणे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. मेघराजे भोसले (अध्यक्ष चित्रपट महामंडळ) , मा . विठ्ठलराव जाधव (विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य) , मा. प्रा. लक्ष्मण हाके (सदस्य राज्य मागासवर्ग आयोग) , डॉ. विश्वासराव सोंडकर (डायरेक्टर युनिवर्सल बायोकॉन प्रा. लि .), बाळासाहेब सानप (अध्यक्ष -जय भगवान महासंघ) , डॉ. धनंजय वाळेकर (चार्टर्ड अकाउंटंट) , अशोक जाधव (भवानीनगर साखर कारखाना एमडी) व मा.श्री. दिलीप रायाअन्नावार (तहसीलदार ) तसेच स्वागतअध्यक्ष मा. डॉ. फडतरे (हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड व शरणाप्पा अचलेकर (निवड समिती) आदी सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला.
कु.सुहास कुदळे यांनी सामजिक काम करत असताना समाजासाठी भरीव असे कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत शरणाप्पा अचलेकर गुरुजी (अक्कलकोट) यांनी हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ,कराड यांची राज्यस्तरीय सह्याद्री पुरस्कारासाठी निवड केली. नुकताच पुणे इथे पार पडलेल्या सोहळ्यात सुहास कुदळे यांनी मित्र परीवारासमवेत हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
प्रेरणा आणि प्रोत्साहन मानवी जीवनासाठी शक्ती वर्धकाचे काम करतात. पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. म्हणूनच कु, सुहास कुदळे यांच्या गुणवतेबद्दल आदर असणाऱ्या आणि आपल्या गुणांची कदर करणाऱ्या हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराडयांनी आपली विशेष दखल घेतल्यानेच हे गौरवरुपी पुष्प आपणांस बहाल करण्याची संधी संस्थेला मिळाली. आपले उल्लेखनिय स्पृहणीय व चौफेर काम गौरवास्पद असेच आहे.
हुतात्मा अपंग बहुउदेशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड भविष्यात अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे. या विधायक वाटचालीस आपले प्रेम व प्रेरणा आणि प्रोत्साहन निश्चित मिळेल याबद्दल विश्वास आहे. हे मानपत्र दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथे होणान्या 3. राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. अभिनंदन ! आपल्या उज्वल, दमदार अन् दिमाखदार वाटचालीस आमच्या लाख लाख शुभेच्छा !!!
मा. डॉ. सुनिल फडतरे मा. हनुमंत धायगुडे पाटील
संस्थापक अध्यक्ष