Google Ad
Editor Choice Politics Pune

Pune : खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली … यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६जून) : खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्याचं स्वागत आहे. मराठा आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना आमचा पाठिंबा राहील हे आम्ही आधीच सांगितलं आहे. उद्या शरद पवारांनी आंदोलन केलं तर आम्ही त्यांच्याही पाठी उभे राहू.

संभाजीराजे तर आमचे राजे आहेत. नेते आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Google Ad

संभाजीराजेंच्या घोषणेचं आम्ही स्वागत करत आहोत. मराठा आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करत असेल तर भाजप स्वत:चा झेंडा न घेता या आंदोलनात उतरेल हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण आणि तात्काळ सवलती मिळून देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्यांच्या पाठी आम्ही उभे राहू. उद्या शरद पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी आम्ही उभे राहू. महाराज तर आमचे नेते आहेत. आमचे राजे आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत, असं पाटील म्हणाले.

संभाजीराजेंना आमचं काही सहकार्य हवं असेल तर आम्ही त्यांना मदत करू. आम्ही आंदोलनात आलो तर राजकीय रंग लागू शकतो. आमच्या हातात झेंडा नसला तरी आमची आयडेंटीटी गडद आहे. त्यामुळेच आमचं सहकार्य असेल तर आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. आम्हाला महाराजांचं नेतृत्व मान्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!