महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ एप्रिल) : आज (१६ एप्रिल) रंजना हॉल पिंपरी येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड आणि योगिनी वधुवर सुचक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वधू-वर मेळाव्याला जवळपास 700 हून अधिक लोकांनी हजेरी लावली होती .त्यात जवळपास 300 इच्छुक वधू-वर उपस्थिती होते. राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गोविंद भाऊ कुलकर्णी आणि श्रीमती रंजनाजी पाठक यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरुवात केली .
सध्या सर्व समाजामध्ये मुलींची संख्या फारच कमी आहे, त्यामुळे मुलांचे लग्न होण्यास उशीर होत आहे याची खंत त्यांनी बोलवून दाखवली व म्हणून आपण महासंघातर्फे या मेळाव्याचे नियोजन करण्यास सांगितले, वधू वर सूचक मेळाव्याचे महत्त्व आरएसएस चे श्री हेमंत हरहरे यांनी सांगितले,योगिनी वधु वर सुचक मंडळाच्या वृषाली जोशी, प्रितेश कुलकर्णी
तसेच पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष श्री सचिन कुलकर्णी कार्याध्यक्ष महेश बारसावडे संघटन सचिव श्री सचिन बोधनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे सौ.मंजिरी सहस्त्रबुद्धे संध्या कुलकर्णी, सतीश देशपांडे सौ प्रियंका नंद, सौ स्मिता देशपांडे, सौ शुक्ला, सौ अश्विनी मेहरूणकर, सौ सीमा कुलकर्णी, श्री सतीश देशपांडे तारे काकू,अरुण काका, नरेंद्र चिपळूणकर ,सुभाष फाटक,भाऊ कुलकर्णी,पंकज कुलकर्णी,पंकज शर्मा,दीपक शर्मा प्रशांत कुलकर्णी मकरंद कुलकर्णी. या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
विशेष उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप जी कुलकर्णी पुष्कराज गोवर्धन राजन जी बुडूख त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रसिद्ध उद्योजक श्री भावेन पाठक यांनी रंजना बँक्वेट हा हॉल उपलब्ध करून दिला व कार्यक्रमाचे आभार मानले. व हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑक्टोबर :- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आधार…
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…