महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ११ नोव्हेंबर २०२३ :– शहरातील वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील असून त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणेही तितकेच महत्वाचे आहे. वायू प्रदूषण नियंत्रण पथकांच्या वतीने शहरातील विविध जागांची पाहणी करण्यात येत असून वायू प्रदूषण रोखणेकामी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. तरी शहरातील नागरिकांनीही वायू प्रदूषण नियंत्रण पथके पाहणीसाठी आल्यास त्यांना सहकार्य करावे आणि शहरातील वायू प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले होते.
पिंपरी चिंचवड शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांच्या वतीने आतापर्यंत एकूण अनेक ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून त्यातील ब-याच ठिकाणी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, वायू (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा १९८१ नुसार नोटीस बजावण्यात आली होती.
महापालिका कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी आतापर्यंत एकूण १२ लाख ९२ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर आज १३ लाख ६२ हजार असा दोन दिवसात २६ लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या नियंत्रणाखाली कारवाई करण्यात येत असून ती यापुढेही चालू राहणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22ऑगस्ट :- पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याकरीता आणि हरकती…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22ऑगस्ट : केशवराव ठाकरे स्टेडियम यमुनानगर येथे सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती…
Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 21 ऑगस्ट -- उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून पुरस्का देण्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, २० ऑगस्ट २०२५ :* अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड शहरात पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर आज…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि .20 ऑगस्ट ---पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पिंपरी भागातील नदीकाठच्या रहिवाशांना…