Google Ad
Uncategorized

पिं. चिं. मनपाच्या सांगवी रुग्णालयाच्या अंतर्गत दापोडी येथे ‘नागरी आरोग्य पोषण दिन’ कार्यक्रमात २०० हुन अधिक नागरिकांनी घेतला लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगवी रुग्णालयाच्या अंतर्गत दापोडी दवाखान्याच्या वतीने दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी, नागरी आरोग्य पोषण दिन मोठ्या प्रमाणात त्रिरत्न हॅाल, दापोडी येथे साजरा करण्यात आला.

या शिबिरात रुग्ण तपासणी साठी स्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, दंतरोगतज्ञ, फिजीशीयन, आहार तज्ञ तसेच मार्गदर्शक उपलब्ध होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकिय अधिकारी, डॅा. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले.

Google Ad

या नागरी आरोग्य पोषण दिन उपक्रमात रक्तदाब तपासणी व उपचार, गर्भाशय मुख कॅन्सर तपासणी, स्तन कॅन्सर तपासणी, तोंडाचा कॅन्सर तपासणी, गरोदर माता तपासणी व उपचार, बालकांची तपासणी, उपचार व लसिकरण, किशोरवयीन मुला- मुलींची तपासणी व समुपदेशन, रक्त तपासणी- हिमोग्लोबिन, मधुमेह तसेच डेंगू , मलेरिया तपासणी, क्षयरोग तपासणी व मार्गदर्शन , कुष्ठरोगा विषयी मार्गदर्शन ,आहार व योगा या विषयी मार्गदर्शन, कुटुंब नियोजन साधनां विषयी माहिती, गर्भाशय मुख तपासणी (Pap smear), सरकारी योजनांची माहिती, पाककला स्पर्धा , आभा कार्ड , CPR चे प्रात्यक्षिक अशा सर्वांगीण शिबिराचा २०० हुन अधिक नागरीक व रुग्णांनी यावेळी लाभ घेतल्याचे पहावयास मिळाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे , ह’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी श्री ढाकणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगवी रुग्णालय डॉ. तृप्ती सागळे , वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री शेलार, डॉ.वैशाली भामरे, डॉ.करुणा साबळे, डॉ.नरके, डॉ.शरद पोले आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!