Google Ad
Editor Choice india

W.B. : लसीकरण प्रमाणपत्रावर आता या राज्यात मोदींऐवजी दुसराच फोटो … सरकारच्या निर्णयाने भाजप लालेलाल!

महाराष्ट्र 14 न्यूज : देशात कोरोनाचा जोर कमी होत असला तरी त्यावरून होणारे राजकारण मात्र कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. केंद्रातील सत्ताधारी आणि विविध राज्यांत सत्तेवर असणारे विरोधक आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याऐवजी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. त्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोचा वाद प्रचंड रंगला आहे. लस घेतल्यानंतर कोविन अॅपवरून मिळणाऱया प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येत असल्याने भाजपविरोधी राज्यांनी त्याला आक्षेप घेतला आहे.

काँग्रेसशासित छत्तीसगडनंतर आता पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो दिसणार आहे. तिसऱया टप्प्यातील लसीकरणावेळी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र असणारे प्रमाणपत्र पश्चिम बंगालवासीयांना मिळणार आहे.सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या या निर्णयाने भारतीय जनता पक्ष मात्र संतापाने लालेलाल झाला आहे.

Google Ad

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरु झाला होता. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला आक्षेप घेतला होता. पंतप्रधानांचा हे छायाचित्र आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. मात्र आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावर लागणार असल्याने दोन्ही पक्षांमधील वाद आणखी वाढणार आहे.

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र काढून त्याजागी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र छापणे हा पंतप्रधानपदाचा अवमान ठरेल असे सांगून भाजप प्रवत्ते समीक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल एक स्वतंत्र देश असल्यासारखा वागत आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणारे वर्तन करीत असल्याची टीका केली आहे.

पश्चिम बंगाल हा हिंदुस्थानचा भागच नाहीय अशा थाटात ममता दीदी वागत असल्याचाही ठपका भट्टाचार्य यांनी ठेवला.तर भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर लावू शकते तर आम्ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो राज्यातील प्रमाणपत्रांवर का लावू नये? असा प्रतिप्रश्न तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!