Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मुख्याध्यापक नसलेल्या शाळेत मनसेचे अभिनव आंदोलन रिकाम्या खुर्चीला हार घालून महापालिकेचे वेधले लक्ष

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेत अभिनव आंदोलन केले.

या शाळेत गेल्या तीन महिन्यांपासून मुख्याध्यापक नसल्यामुळे मनसेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. हे आंदोलन मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे आणि उप विभाग अध्यक्ष अलेक्सझांडर आप्पा मोझेस, उपविभाग अध्यक्ष मंगेश भालेकर, शाखाध्यक्ष विशाल पाटील यांनी संयुक्तपणे केले.

Google Ad

यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना एक निवेदन दिले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सात दिवसांत या रिक्त पदांची भरती झाली नाही, तर आयुक्त दालनात ‘मनसे स्टाईल’ आंदोलन केले जाईल.” रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनाच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजू सावळे आणि अलेक्सझांडर आप्पा मोझेस यांनी प्रश्न उपस्थित केला की, “पालकांच्या तक्रारी, विद्यार्थ्यांच्या अडचणी, शिक्षकांचे प्रश्न हे कोणाकडे मांडायचे?” याचबरोबर अनेक शाळांमध्ये कला शिक्षकही नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी सांगितले की, “५० नव्हे, केवळ ५-६ शाळांमध्येच मुख्याध्यापक पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी वरिष्ठ शिक्षकांकडे तात्पुरता चार्ज दिला आहे आणि भरती प्रक्रिया सुरु आहे.”

मात्र, आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका शाळांमध्ये नियमित उपस्थिती असतानाही मुख्याध्यापक नसणे ही गंभीर बाब आहे आणि याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!