Google Ad
Editor Choice

या निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाची युती, एकत्र निवडणूक लढवणार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 07 ऑगस्ट — राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वहायला लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. अशातच आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी एक पत्रक जारी केलं आहे. यात त्यांनी म्हटलं की, बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार दि 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेली आहे. सोसायटी निवडणुकीत ज्या पॅनल ची सत्ता असते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. मराठी च्या मुद्द्यावर एकत्र आलेले आणि मराठी अस्मितेचा स्वाभिमान असलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिका च काय महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतील अशी सर्वसामान्य लोकांची धारणा आहे.

Google Ad

बेस्टचे बहुतांश कामगार पुढारी, युनियन चे पदाधिकारी बेस्ट च्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तर कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. बेस्ट पतपेढी ची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी आहे. त्यामुळे बेस्ट मधील ठाकरे बंधू च्या युती ला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

बेस्ट कामगार सेना अध्यक्ष मा सुहास जी सामंत साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुबंई अध्यक्ष मा संदीप देशपांडे साहेब यांच्यामध्ये या युती बाबत मागील काही दिवसा पासून युती बाबत चर्चा सुरु होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्ट मधील प्रत्येक लढाई आता बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार आहे.

मराठी माणसाचा रोजगार म्हणजे बेस्ट उपक्रम पण विद्यमान सरकार मधील पुढारी आणि त्यांची धोरण काही उद्योगपती ना बेस्ट आंदण देण्यासाठी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे बेस्टमधील मराठी कामगार हद्दपार होतं चालला आहे. त्यामुळे बेस्ट मध्ये ठाकरे ब्रँड एकत्र येणं म्हणजे मराठी माणसाची एकजूट मोठया ताकदीने उभी राहणार यांत शंका नाही.

बेस्ट कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ग्रॅज्युएटी साठी मुंबई महापलिका प्रशासन नियमित मदत करत होतं, पण जून 2022 नंतर महायुती सरकार भाजप सतेत आल्या नंतर बेस्ट मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी वाढत चालली आहे. बेस्टचा स्व मालकीचा बसताफा कमी होत चालला आहे नवीन नोकर भरती नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

बेस्ट पतपेढी मध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामामुळं कामगारांचा प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे अजून ताकद वाढली आहे याचा पतपेढीच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार यांत शंका नाही.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!