दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप जगताप यांचे सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतही त्यांनी चांगले राजकीय संबंध ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी पिंपळेगुरव येथील त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी संवाद साधून सांत्वन केले. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतर सदस्यांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री व विद्यमान भाजप आमदार संजय कुटे, आमदार अभिमन्यू पवार, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही रविवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या सर्वांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी संवाद साधून त्यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…
यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…
आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…