Google Ad
Editor Choice

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तांची मनसे कार्यकारणीने घेतली भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ मे) : मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून सध्या राजकारण ढवळून निघालं आहे.

मशिदीवरील भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असं आवाहन राज यांनी केलं आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Google Ad

आज पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मनसे कार्यकारिणीने समक्ष भेट घेतली, यावेळी गणेश आप्पा सातपुते पिं.चिं.प्रभारी, मा.सचिन चिखले पिं.चिं. शहर अध्यक्ष, राजू सावळे, रूपेश पटेकर,विशाल मानकरी,बाळा दानवले,दत्ता देवतरासे,सुशांत साळवी,हेमंत डांगे,अश्विनी बांगर,सिमा बेलापुरकर,प्रिती परदेशी व पिं.चिं. मनसे शहर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना गणेश सातपुते म्हणाले, आम्ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना सांगितले आहे की, आम्हाला राज साहेबांनी सांगितले आहे, की हनुमान चालिसा लावणार असताल तरी पोलिसांकडून त्याची रितसर परवानगी घ्या, आणि ज्या ठिकाणी मशिदींवरील भोंग्यांवरून अजान दिली जाते तिला ही परवानगी आहे का ते पहा! अनधिकृत भोंगे बंद करा, नाहीतर आम्ही तिथे आदेशानुसार हनुमान चालिसा लावणार आणि हे आमचे आंदोलन एक दिवसापूरते नसून ते सातत्याने चालणार आहे. तसेच ज्या मुस्लिम बांधवानी पालन केले त्यांचे आम्ही कौतुक करतो, आणि जे पालन करत नाहीत त्यांनी रीतसर परवानग्या घ्याव्यात.

राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर शहरातील मशिदींमध्ये नियमांचे पालन होऊन आज शांतता असल्याचे पिंपळे गुरव, आकुर्डी, पिंपरी, चिंचवड या भागात दिसून आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!