महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑक्टोबर) : राज्यात एकीकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असून राजकीय पक्षाकडून दौरे, पदयात्रा सुरु आहे. तर दुसरीकडे यंदाच्या निवडणुकांमध्ये तरुणांनाचा आवाज घुमणार असल्याने आमदार रोहित पवार यांनी तरुणांच्या प्रश्नांना हात घालत तब्बल ८०० किलोमीटरची युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी आदीसंह विविध प्रश्नांवर या यात्रेदरम्यान विचारमंथन करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून युवा संघर्ष यात्रेला येत्या २४ ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे पुण्यातून या यात्रेला सुरुवात होईल पुणे ते नागपूर असा हा ८०० किलोमीटरचा प्रवास असणार आहे, एकूण ४५ दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, वाशिम, जातेगाव, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, पिंपळगाव, कुंभार, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप ७ डिसेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान ही पदयात्रा असून तब्बल १३ जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातून युवा संघर्ष यात्रेला सुरवात होणार असून ४५ दिवसांचा प्रवास करून ७ डिसेंबर रोजी नागपूरला याची सांगता होईल. पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून या यात्रेला सुरवात होणार आहे. त्यांनतर वढू तुळापूर येथे नतमस्तक होऊन, यात्रेचा शुभारंभ होईल. संतांच्या, महाराजांच्या भूमीतून यात्रा जाणार असून दररोज कमीत कमी १६ आणि जास्तीत जास्त २५ किमी असा पायी प्रवास असणार आहे. या पदयात्रेचा एक भाग म्हणून, आमदार रोहित पवार इतर असंख्य युवांसोबत पुणे ते नागपूर अशी पदयात्रा करतील आणि राज्यातील तरुण-तरुणींना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी जनतेशी संवाद साधतील. संपूर्ण पदयात्रेदरम्यान, युवांना त्यांची मतं आणि अपेक्षा व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, ‘युवा संघर्ष यात्रा’ ही युवांच्या नेतृत्वाखालील एक चळवळ आहे, ज्याचा मूळ उद्देश महाराष्ट्रातील युवांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जनसमर्थन एकत्रित करणे आणि युवा वर्गाचा आवाज शासनापर्यंत पोहचवणे हा आहे. आज युवा म्हणून संवाद साधत आहे. ज्या दिवसापासून राजकारणात आलो, तेंव्हापासून युवांचे प्रश्न मांडणे अन त्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करत आलो आहे. मतदारसंघाप्रमाणेच युवांच्या प्रश्नांना ही प्राधान्य मांडले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी, शाळा दत्तक देण्याचा निर्णय आदी प्रश्नावर आवाज उठवला जाणार आहे. त्याचबरोबर आजच्या राजकारणाची परिस्थिती पाहता युवा नेत्यांनी राजकारणात आलो ही चूक झाली का? किंवा नव्या पिढीने राजकारणात यावं की नाही? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील युवावर्ग हा एकूण लोकसंख्येच्या ४० टक्क्यापेक्षा जास्त असून तो आपल्या राज्याचे भविष्य आहे. अलिकडच्या काही वर्षांत युवांना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी सरकारकडून आवश्यक तसे प्रोत्साहन मिळत नाही. राज्यात बेरोजगारीचा वाढता दर, परीक्षा आयोजित करण्यात दीर्घकाळ होणारा विलंब, पेपरफुटी, अवाजवी परीक्षा शुल्क, कायमस्वरूपी पदवी कंत्राटी नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करू शकणारे राज्याचे हक्काचे मोठमोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणे या आणि इतर असंख्य समस्यांनी युवांचे भविष्य धोक्यात आले आहे. यासाठी युवांनी एकत्रित येऊन सरकारला युवा कल्याणकारी धोरणे आखण्यास तसेच अतिशय महत्त्वाच्या अशा तरुण पिढीच्या आकांक्षा आणि कल्याणासाठी स्पष्टपणे अनुकूल निर्णय घेण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे, यासाठी तरुणाच्या प्रश्नासाठी युवा संघर्ष यात्रा आहे.
राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. झोपेचे सोंग घेतले असेल तर त्यांना जागे करण्यासाठी युवा संघर्ष यात्रा आहे, प्रश्नासाठी लढणं आपल्या हातात आहे, सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात रस नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी पिंपरीत केली. पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, युवा अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक गणेश भोंडवे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…