Google Ad
Editor Choice

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे आमदार ‘महेश लांडगे आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख ‘शंकर जगताप’ यांनी केले स्वागत, म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जुलै) : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातला ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया आयोगाने राज्यात 37 टक्के ओबीसी असल्याचं सांगत त्यांना 27 टक्के आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली आहे. या निर्णयाचे भाजपच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जोरात स्वागत केले.

▶️आमदार महेश लांडगे यांनीही केले स्वागत :-
तर राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘आमच्या विचारांचे सरकार राज्यात आल्यावर तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण देणार…’’ असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अखेर खरा ठरला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिली.

Google Ad

▶️भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, …
ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नको, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. आज या निकालामुळे इच्छाशक्ती असेल, तर कोणताही प्रश्न कसा सोडवता येतो, याचा आदर्श महायुती सरकारने घालून दिला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन आणि आभारही मानतो, असे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!