Google Ad
Editor Choice

आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या “राज्यात कोरोना महामारीच्या काळात अनाथ झालेल्या मुलांच्या… ‘वात्सल्य योजने’ला  शासनाचा सकारात्मक प्रतिसाद .

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९जुलै) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत . अशी अनेक मुले आहेत , ज्यांनी या महासाथीमुळे आपले आई – वडील गमावले आहेत . लहान मुले म्हणजे देशाच् भविष्य आहे. या कुटुंबातील लहान मुलांच्या डोक्यावरील छत्र हरविल्याने सदर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना सामाजिक दायित्व म्हणून सरकारने आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे .

कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनाथ झालेल्या लहान मुलांना शासनाने ‘ वात्सल्य योजने ‘ अंतगर्त मोफत शिक्षण व वयाच्या १८ वर्षापर्यंत दरमहा पाच हजार रुपये आर्थिक मदत करणे गरजेचे आहे . जेणेकरून अशा अनाथ मुलांचे जगणे सुसाह्य होईल व जीवनास उभारी मिळेल .

Google Ad

वात्सल्य योजनेंतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना मोफत शिक्षण व आर्थिक मदत देण्याबाबत शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना योग्य ते कार्यवाहीचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिनांक १५ मे २०२१ रोजी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती.

त्याबाबत शासनाने दिनांक २३.०७.२०२१ रोजी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसे पत्र यशोमती ठाकूर , मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मागणीची दखल घेतली असून तसे पत्र पाठवून कळविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की कोविड -१९ या रोगाच्या पार्श्वभुमीवर या कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मुलांना त्यांच्या भविष्याचा विचार करता रु .५ लक्ष पर्यंतची मुदत ठेव बाबत महिला व बाल विकास विभाग , शासन निर्णय दि . १७ जून , २०२१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे . तसेच बाल संगोपन योजनेंर्गत दरमहा रु . ११०० / – इतके अथसहाय्य अनुज्ञेय असेल ,

तसेच कोविड १९- या रोगाच्या पार्श्वभुमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी व या कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दि . ०७.०५.२०२१ अन्वये जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्यात आला आहे . असे कळविण्यात आले आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!