महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ एप्रिल) : खेलो इंडिया” या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या आर्या गार्डे हिने सुवर्णपदक, तर श्रेया धांदर हिने कांस्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हरियाणातील रोहटक येथे विविध प्रकारच्या खेळांसाठी “खेलो इंडिया” ही राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच झाली. त्यातील बॉक्सिंग स्पर्धेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या आर्या गार्डे व श्रेया धांदर या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीबद्दल भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच प्रशिक्षक राहुल पाटील यांचाही त्यांनी विशेष सत्कार केला. या खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, लक्ष्मणभाऊ जगताप कला क्रीडा अकादमीचे अध्यक्ष माऊली जगताप, प्रशिक्षक राहुल पाटील, संदीप धांदर, अनिकेत दळवी, विशाल लायगुडे, दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…