Google Ad
Editor Choice

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ करणार मतदान ; रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जून) : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. मतदानासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत.

चिंचवड विधानसभेच्या भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असल्याने ते आज होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांच्या मतदानासाठी मुंबईला जातील का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण “पक्षाचा आदेश आहे आणि तो मला पाळायचायं,” या मतावर ठाम असलेले जगताप हे मुंबईच्या दिशेने ॲम्बुलन्सने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Google Ad

लक्ष्मण जगताप हे एका कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईकडे सकाळी आठ वाजता रवाना झाले आहेत. यावेळी लक्ष्मण जगताप यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि डॉक्टरांचे पथक यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. ते जवळपास बारा वाजता दरम्यान विधानभवनात पोहोचणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले लक्ष्मण जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना २ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना एअर अँब्युलन्समधून नेणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला असून त्यांना रस्त्याने नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू शंकर जगताप आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!