Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार लक्ष्मण जगताप यांनी पर्यावरण दिनानिमित्त … पिंपरी – चिंचवड शहराच्या नाव लौकिकाप्रमाणेच पिंपळ , चिंच , वडाच्या पाच हजार झाडांची लागवड करण्याचा केला संकल्प!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जून) : देशात वृक्षांच्या नावाने लौकिक असलेले पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर आहे . शहराच्या नावाप्रमाणेच पिंपळ- चिंच- आणि वड या देशी वृक्षांची पाच हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प आज शनिवारी ५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांनी राजमाता जिजाऊ गार्डन पिंपळे गुरव येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम प्रसंगी केला.

शहरातील वृक्षांची संख्या वाढवावी व माझे पिंपरी-चिंचवड, हिरवेगार पिंपरी चिंचवड, प्रदूषण मुक्त पिंपरी-चिंचवड करण्याकरिता पर्यावरण प्रेमी , वृक्षप्रेमी, लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाने एकत्रित येऊन सहकार्याने कार्य केल्यास शहर सुंदर व हिरवेगार ठेवता येईल असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मांडले.

Google Ad

या वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी नगरसेवक शशिकांत आप्पा कदम, नगरसेवक सागर आंगोळकर, संजय मराठे, नवीन लायगुडे, मारुती तरटे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त व उद्यान विभागाचे प्रमुख सुभाष इंगळे ,उद्यान विभागाचे अधिकारी गोसावी, स्थापत्य विभागाचे उपअभियंता चंद्रकांत मोरे, राहुल पाटील व शिर्के कंपनीचे विजय बांदल व शहरातील पर्यावरण व वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

77 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!