Google Ad
Editor Choice

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना दिला मायेचा आधार … चेहऱ्यावर हसू खुलवत दिवाळी केली गोड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०१ नोव्हेंबर) : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा मांगल्याचा सण, हा सण साजरा करीत असताना आपण सर्वच आनंदाने आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी वेगवेगळ्या खरेदी करीत असतो. गोड पदार्थ, नवे कपडे, नवे साहित्य फटाके या सर्वांचीच आपल्याकडे रेलचेल असते. आपण आपल्या परिवारा सोबत अगदी उत्साहात दिपावली हा सण साजरा करतो.

अशीच दिवाळी आमदार लक्ष्मण जगताप व चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संजय गांधी निराधार योजना’ समिती चिंचवड विधानसभा यांच्या कडून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयामध्ये ‘संजय गांधी निराधार योजना’ व ‘श्रावण बाळ योजने’च्या माध्यमातून मायेचा आधार देत साजरी करण्यात आली. यावेळी ५० लाभार्थ्यांमध्ये ३० विधवा, १० ज्येष्ठ नागरिक, दोन मूकबधिर, ८ अपंग लाभार्थ्यांना पेन्शन पत्र व मिठाईचा बॉक्स देण्यात आला. तेव्हा लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाल्याचे यावेळी दिसून आले.

Google Ad

यावेळी भाजपचे चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख शंकर जगताप म्हणाले, ‘की आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीचे काम चालू असल्यामुळे चिंचवड विधानसभा क्षेत्रात संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेणार्‍याची संख्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे, ही समिती या योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी काम करण्यासाठी सदैव तत्पर असते, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून येते.

यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या माजी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन,माजी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, संदीप गाडे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, संजय मराठे, दिलीप गडदे, टाटा मोटरचे कामगार प्रतिनिधी नामदेव शिंत्रे सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप,कुंदा गडदे,रवी खोकर,पंकज सारसर आदी मान्यवर व लाभार्थी यावेळी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!