Google Ad
Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप बनले बांधकाम कामगारांचे आधार … ९७ बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे सांगवी येथे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ डिसेंबर) : कोरोना महामारीचा संपूर्ण जगालाच मोठा फटका बसला आहे. यातच हातावर पोट असलेल्या कामगार वर्गावरही कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे.

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर, बांधकाम कामगारांना आपले काम पुन्हा सुरु करण्यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने कामगारांना सुरक्षा संच किट उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Google Ad

कोरोना काळात संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना या कामगारांवर देखील उपासमारीची वेळ आली होती. असंघटित कामगार असणाऱ्या या कामगारांना आमदार लक्ष्मण जगताप ५ रुपयात जेवणाची त्यांच्या आरोग्यासाठी लागणारे उपचाराची सोय देखील या काळात करण्यात आली.

आज सांगवी येथील विष्णुपंत ढोरे चौकात असणाऱ्या मजूर अड्ड्यावर मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या वतीने ९७ नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राजेंद्र राजापुरे, महेश जगताप, शारदाताई सोनवणे, अनिल कांबळे, उषाताई मुंढे, आप्पा ठाकर, बाळासाहेब ढोरे, जवाहर ढोरे, राजू नागणे, चंद्रकांत बेंडे उपस्थित होते .

बांधकाम कामगार मंडळाचे  गणेश पुसाळकर, राजेश येशी, आदित्य कांबळे, सागर मोरे यांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले.
या सुरक्षा संचामध्ये ,पेटी, चटई, मच्छरदाणी, तीन तळ्याचा डब्बा, पाण्याची बाटली, सेफ्टी शूज, उंचीवर काम करताना लागणार सेफ्टी बेल्ट, हेलमेट,स्पोर्ट बॅग, रेडियम असलेला जॅकेट,इत्यादी वस्तूंचा समावेश असतो.
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!