प्रभाग क्र २५ वाकड मधील सोसायटीधारकांच्या प्रश्नांसंदर्भात आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप मैदानात.
अधिकाऱ्यांसमवेत सोसायटीमध्ये जाऊन विविध कामांचा पाहणी दौरा व समस्यांवर चर्चा.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ एप्रिल) : आज वाकड परिसरातील पनाश सोसायटी, शिवांजली सोसायटी, यश व्हीसटेरीया व गणेश इम्पेरिया सोसायटी मध्ये जाऊन अधिकाऱ्यांसमवेत चालू असलेल्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याची पाहणी केली तसेच चालू कामांबाबत नागरिकांना येत असलेल्या अडचणी समजून घेत तत्काळ अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे नाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या यावेळी नागरिकांनी सांगितल्या त्या अनुषंगाने सदरील नाल्या ची प्रत्यक्ष पाहणी करून नाल्यात सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी तात्काळ बंद करण्याबाबत सूचना देताना नाल्यावर बांधण्यात आलेले लेबर कॅम्पचे शौचालय त्याचप्रमाणे नाल्याच्या शेजारी पत्र आणि मला मध्ये पाईप टाकून भर घालून बुजवण्यात आलेला नाल्यातील भर व पाईप तात्काळ काढून टाकण्याबाबत कडक शब्दात सूचना दिल्या , सदर नाला गाव नकाशा प्रमाणे आहे का की त्याच्यावर कोणी अतिक्रमण केला आहे याची खात्री करण्याची आदेश दिले संबंधित भागात भेट देऊन माव्यातील सांडपाण्यापासून होणाऱ्या त्रासावर यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने संबंधित विभागास निर्देश देण्यात आले. नागरिकांनी देखील याबाबत समाधान व्यक्त करीत आमदार महोदयांचे कौतुक केले.
यावेळी , निवडणूक प्रभारी संतोष कलाटे, रणजीत कलाटे, स्नेहा कलाटे, मा.नगरसेवक विनायक गायकवाड, संदीप कस्पटे,भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष राम वाकडकर त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे मला निसरण विभागाचे व पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीयुत देसले, स्थापत्य विभागाचे व जालानिस्सःरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.