महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ मार्च) : कोरोना महामारीचा संपूर्ण जगालाच मोठा फटका बसला आहे. यातच हातावर पोट असलेल्या कामगार वर्गावरही कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर, बांधकाम कामगारांना आपले काम पुन्हा सुरु करण्यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या वतीने कामगारांना सुरक्षा संच किट उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांची ही वाटचाल त्यांच्यामागे त्यांची पत्नी आमदार अश्विनी जगताप यांनीही सुरू ठेवली आहे.
रोना काळात संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना या कामगारांवर देखील उपासमारीची वेळ आली होती. असंघटित कामगार असणाऱ्या या कामगारांना स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने ५ रुपयात जेवणाची व त्यांच्या आरोग्यासाठी लागणारे उपचाराची सोय देखील या काळात करण्यात आली.
स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा वसा पुढे चालू ठेवत, आपल्या मतदार संघातील नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या वतीने ११० बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप करण्यात आले. स्व.आमदार जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून गेली ४ वर्षात चिंचवड विधानसभा मतदार संघातील विविध ठिकाणी असलेल्या कामगार नाक्यावरील बांधकाम कामगाराना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे,,आज आमदार लक्ष्मणभाऊ आपल्यात नाहीत पण त्यांच्या कार्याची वसा हा आमदार अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमातून पुढे असाच सुरू राहील अशी ग्वाही या प्रसंगी आमदार अश्विनीताई जगतात यांनी दिली.
सदर कार्यक्रमास योगेश चिंचवडे, संकेत चोंधे, अमर आदियाल, राम वाकडकर, निलेश जगताप, शशिकांत गायकवाड, भाऊसाहेब जांभुळकर , गणेश पुसाळकर, सागर मोरे हे उपस्थित होते.
बांधकाम कामगार मंडळाचे गणेश पुसाळकर, राजेश येशी, आदित्य कांबळे, सागर मोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
या सुरक्षा संचामध्ये ,पेटी, चटई, मच्छरदाणी, तीन तळ्याचा डब्बा, पाण्याची बाटली, सेफ्टी शूज, उंचीवर काम करताना लागणार सेफ्टी बेल्ट, हेलमेट,स्पोर्ट बॅग, रेडियम असलेला जॅकेट,इत्यादी वस्तूंचा समावेश असतो.
सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांनी केले होते.