Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

आमदार आण्णा बनसोडे यांनी सांगितला गोळीबारचा थरार … का आणि कोणी केला गोळीबार?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या चिंचवड येथील कार्यालयात त्यांच्यावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. सुदैवाने त्यात ते बचावले आहेत. घटनेचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. आरोपीने पिस्तूलातून गोळ्यांच्या तीन फैरी झाडल्याची माहिती समजली आहे. तानाजी पवार असे त्याचे नाव असून त्याला बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Google Ad

गोळीबार झाल्यानंतर आण्णा बनसोडे यांनी थोड्याच वेळात प्रतिक्रिया देताना सांगितले की …

अँथनी म्हणून महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर असणाऱ्याच्या तानाजी पवार या सुपरवायझर कडून हा गोळीबार केला गेल्याचे आण्णा बनसोडे यांनी सांगितले, आण्णा बनसोडे म्हणाले की माझ्या पी ए ने तानाजी पवार यांना फोन केला की, ‘माझी दोन मुले कामाला घे’ असा फोन ते दहा दिवसांपासून करत होते, असे म्हटल्यावर त्याने आरेरावीची भाषा केली.

आज तानाजी पवार हा माझ्या ऑफिस मध्ये आला पाच ते सात मिनिटे बसला बोलला, मी त्याच्या मालकाशीही बोललो, सर्व विषय सोडून दे असे बनसोडे यांनी त्यास सांगितले आणि जाताना त्याने गोळीबार केला. येताना तानाजी पवार हा पूर्वनियोजित आपला साथीदार आणि म्हेव्हना यांना बरोबर घेऊन नियोजन करून आला होता, त्यांच्याकडेही पिस्तुल होते. ऑफिस मध्ये थोडी वादविवाद झाले, त्यातून त्याने माझ्या दिशेने एक व बाजूला एक फायरिंग केली. यातून पुढे हा प्रकार घडल्याचे आण्णा बनसोडे यांचे म्हणणे आहे.

पुढील तपासात काय ते निष्पन्न होईल, आणि मी सुखरूप आहे, माझ्या पिंपरी विधानसभेतील कार्यकर्त्यांनी शांत राहून संयम बाळगावा असे आवाहन आण्णा बनसोडे यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

142 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!