Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘मिशन इंद्रधनुष्य’ … शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ७ ऑगस्ट २०२३): महानगरपालिकेच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी संपुर्ण देशभर लसीकरण करण्यात येत असून शहरातील बालकांनी लस घेतली नसल्यास त्यांच्याकरिता महानगरपालिकेच्या दवाखान्यात तसेच रुग्णालयांमध्ये आणि सर्व जोखमीच्या भागांमध्ये बाह्य संपर्क सत्रांद्वारे लसीकरणाची विशेष सोय उपलब्ध असून पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या मोहीमेचा प्रारंभ आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या उपस्थितीत आज आकुर्डी रुग्णालय येथे करण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर,महिला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, डॉ. विकास बोरकर, डॉ. राहुल साळुंके, डॉ. धीरज तायडे, डॉ. वैभव म्हस्के, डॉ. अंजली ढोणे, पीएचएन लता जगताप, शाहीन खान,एमपीडब्ल्यू संदीप जगताप, दत्तात्रय इंगळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते फादर खिंडो, इमॅन्युएल व्ही. सी, मसुद शेख, सुलतान मुलानी, मुसा शेख, रवाजा पटेल उपस्थित होते.

विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहीम शहरात तीन फेऱ्यांमध्ये होणार असून यामध्ये पहिली फेरी आजपासून १२ ऑगस्टपर्यंत, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर तर तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. लसीकरण पुर्ण करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ३६२ विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार असून प्रत्येक बालकाचे डिजीटल एमपीसी कार्ड तयार केले जाणार आहे.

केंद्र शासनाने ऑगस्ट २०२३ पासून ३ फेऱ्यांमध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकांमध्ये ‘’विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०” कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने पिंपरी चिंचवड शहरात लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन केले झोपडपट्टी आणि इतर जोखमीच्या भागातही लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन …. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन  - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…

2 days ago

एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार’

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…

4 days ago

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट…* *आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…

2 weeks ago

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…

3 weeks ago

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…

3 weeks ago