Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपा तसेच मेट्रोचा गलथान कारभार … कारवाई न झाल्यास, मनसे स्टाईलने देणार उत्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० जुलै) : पिंपरी चिंचवड मनपा तसेच मेट्रोचा गलथान कारभार पुन्हा पुन्हा चव्हाट्यावर येत आहे, संत तुकाराम नगर येथिल मेट्रोच्या पुलाच्या खालच्या मुख्य रस्त्याला खड्डा १५ पडलेला दिवसापेक्षा जास्त झाले. हा खड्डा सुरूवातीला छोटा होता आता मोठा व खोल झाला आहे. माहिती घेतली असता येथे ४ अपघातही झाले आहे. येथुन वाहन ६० ते ८० च्या वेगाने धावतात वाहन वेगाने असल्याने अपघात होतात परंतू याची दखल मेट्रोही घेत नाही व मनपा देखिल घेत नाही. दोघांनाही विचारले तर म्हणतात आमचे काम नाही….

मग काय नागरिकांचे आहे का ? असा प्रश्न मनसेने केला आहे.

काल मनसे पदाधिकारी टिम थेट मेट्रो कार्यालयात जाऊन जाब विचारला व अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन लवकरात लवकर हा रस्ता दुरूस्त करावा अन्यथा या नंतर याठिकाणी कोणताही छोटा मोठा अपघात किंवा जिवीतहानी झाल्यास आपण जबाबदार असाल पुढील कार्यक्रम मनसे स्टाईलनेच होईल याची नोंद घ्यावी…. असे राजू दत्तू सावळे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) म्हणाले.

Google Ad

अशातच पुणे – शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाला अवघ्या चार महिन्यांत बूस्टर मिळणार आहे. तसेच दोन्ही शहरांतील बहुतांश मेट्रो प्रकल्पाचे काम डिसेंबअखेर जाहीर होणार असल्याचे महामेट्रोने शुक्रवारी जाहीर केले.

शहरात पिंपरी चिंचवड – स्वारगेट आणि वनाज- रामवाडी दरम्यान ३१ किलोमीटरचे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यातील पिंपरी – फुगेवाडी आणि वनाज- गरवारे कॉलेज दरम्यान मेट्रोचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!