यावेळी शिक्षक संवर्ग, पालक वर्ग, विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित राहणार असून त्यांच्या समवेत महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील संवाद साधणार आहेत.
महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती या मेळाव्यामध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहितीही देण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त पालकांकडून प्रशासनाला काही सुचना असतील तर त्यावरही सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली.