Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘प्रशांत शितोळे’ यांच्या मागणीची महापौर माई ढोरे यांनी घेतली दखल … पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या जीवासाठी खर्च करण्याचे केले होते आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०८ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला महानगरपालिकेच्या खर्चातून लस द्यावी अन्यथा नागरिकांच्या जीवासाठी खर्च करण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत म्हणून महानगरपालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना एका निवेदनाद्वारे दि.२७ एप्रिल रोजी केली होती.

या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव आशिया खंडात श्रीमंतीच्या बाबतीत नावाजलेले आहे आणि आजही महानगरपालिकेकडे मुबलक पैसे आहेत. नुकताच महानगरपालिकेचा जवळपास 5500 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजुरी झाला आहे . गेल्या वर्षभरामध्ये कोरोना सारख्या महामारी साठी महानगरपालिकेने आज पर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलेला नाही आणि तो नागरिकांच्या जीवासाठी अर्थसंकल्पाच्या दहा टक्के सुद्धा नाही. गेल्या 4 वर्षात तर मोठ्या प्रकल्पांचे आकडे पाहिले तर सर्वसामान्यांना त्या आकड्यातील कोटींचे शून्य किती आहेत हे सुध्दा मोजता सुद्धा येणार नाहीत. आता मात्र त्याच सर्वसामान्यांच्या जीवावर आलेली वेळ आहे त्यामुळे याच श्रीमंत महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आज रोजी आहे तसे मोफत केले पाहिजे. अशी आक्रमक भूमिका प्रशांत शितोळे यांनी घेतली होती.

Google Ad

महानगरपालिकेमध्ये जवळपास 3.50 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे अगदी 30 लाख लोकसंख्या अंदाजे गृहित धरली तरीही महानगरपालिका 25-30 कोटी रुपयांकडे बघणार नाही व त्या आर्थिक परिस्थितीची महानगरपालिका आहे असा आम्हाला आज तरी विश्वास आहे. महानगरपालिकेने लसीकरणाबाबत केंद्रशासन , महाराष्ट्र शासन यांचा काहीही निर्णय होवो त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी न ढकलता आपल्या शहरातील नागरिकांची जबाबदारी आपली सुध्दा आहे हे समजून प्रत्येक नागरिकाला तातडीने खरेदी करून घेण्याची परवानगी केंद्र शासनाने कडून घेऊन लसीकरणाची उपलब्धता करून घ्यावी व दोन महिन्यात शहराचे 100% लसीकरण करून घ्यावे म्हणून प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली होती, या मागणीची दखल महापौर ‘माई ढोरे’ यांनी घेतली असल्याचे दिसत असून, त्यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन १५ लाख कोरोना प्रतिबंधक लस महापालिकेने स्वखर्चाने घेण्याची तयारी दर्शविली आहे. ही शहरातील नागरिकांना दिलासा देणारी गोष्टच म्हणावी लागेल.

सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेला कोरोनाच्या संकटकाळात सत्कार्यास एकमेकांना साथ देत असल्याचे यावरून तरी दिसून येत आहे. मागणी कोणाचीही का असेना ती नागरिकांच्या जीवनाशी आणि आरोग्याशी संबंधीत असल्याने त्यात राजकारण होऊ नये अशी सर्वसामान्य नागरिकांची भूमिका असते. त्यामुळेच प्रशांत शितोळे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला महानगरपालिकेच्या खर्चातून लस द्यावी, अन्यथा नागरिकांच्या जीवासाठी खर्च करण्यासाठी पैसे नसतील तर महानगरपालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी , या मागणीला यश आल्याचे सध्या तरी दिसून येत आहे …

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!