महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ जानेवारी २०२३) : देशभरात नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. जल्लोषात आतषबाजी करण्यात आली. सर्वजण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना नवीन वर्ष २०२३ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक नेत्यांनीहि शुभेच्छा दिल्या आहेत. ‘२०२३हे वर्ष तुमच्यासाठी अप्रतिम जावो! ते आशा, आनंद आणि भरपूर यशाने भरलेले जावो. सर्वांना चांगले आरोग्य लाभो.’ अशी मनोकामना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्विट करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, ‘२०२३ वर्षासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! प्रभू श्री रामाच्या कृपेने हे नवीन वर्ष तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी, शुभेच्छा, उत्साह आणि आरोग्य घेऊन येवो.’
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१ मार्च - राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य…
॥ रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा ॥ महाराष्ट्र 14 न्यूज, दि २५ फेब्रुवारी : महाराष्ट्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी…
सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी…