Categories: Editor Choice

१ मे, कामगारदिनी चिंचवडेनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन … लसीकरणापूर्वी रक्तदान आवश्यक!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज ओळखून सचिनदादा चिंचवडे युथ फाऊंडेशन पिंपरी चिंचवड, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड, जय गुरुदत्त मित्र मंडळ चिंचवडेनगर, क्षत्रिय माळी समाज सुधारक संस्था पिंपरी चिंचवड, श्री सद्गुरू बाळुमामा बहुउद्देशीय संस्था चिंचवडेनगर, यशवंत फाउंडेशन संभाजीनगर या संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर येत्या 1 मे रोजी कामगारदिनी सकाळी 10 वाजता माजी उपमहापौर नगरसेवक सचिनदादा चिंचवडे यांचे जनसंपर्क कार्यालय, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवडेनगर येथे होणार आहे. रक्तदान शिबिरादरम्यान सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

🩸अधिक माहितीसाठी :-
सचिनदादा चिंचवडे-
7720847575
लिलाधर मगरे- 9923837854, बंडू मारकड – 9922493330, संतोष पांढरे- 99600 27633, सुनील बनसोडे- 8888858026, सचिन कोपनर- 91750 07586, संजय कवितके- 79727 39583
या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

▶️लसीकरणापूर्वी रक्तदान आवश्यक…

देशभरात १ मे पासून १८ वर्षांच्या पुढील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण झाल्यानंतर पुढचे ६० दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे पुढील दोन तीन महिन्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रक्ताचा हा तुटवडा टाळण्यासाठी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

20 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago