Google Ad
Editor Choice

MAVAL: गुड न्यूज … मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरण ५५.०७ टक्के भरले!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२२जुलै) : गेल्या आठवड्यात मावळात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पवना धरण ५५.०७ टक्के भरले आहे . मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्या पाण्याची पातळी वाढत आहे . धरण परिसरात २४ तासांत २३२ मिमी पावसाची नोंद झाली असून , या वर्षी १ जून पासून आजअखेरपर्यंत केवळ ११२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे . पिंपरी चिंचवड शहरातही आज दिवसभर पावसाची संतत धार सुरू आहे.

गेल्या वर्षी आज अखेरपर्यंत सुमारे ४८७ मिमी पावसाची नोंद झाली होती . पवना धरण पाणलोट क्षेत्रात २४ तासांत २३२ मिमी पावसाची नोंद झाली . धरणाचा पाणीसाठा ५५.०७ टक्के इतका झाला आहे . गत वर्षी आजअखेर धरणाचा साठा ३४.९६ टक्के झाला होता . यासह लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पुन्हा पाणी ओसंडून वाहू लागले आहे . मावळातील नद्या , ओढे नाले ओसंडून वाहत आहेत .

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!