महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ नोव्हेंबर) : वसुबारस सवत्स धेनु पुजन करण्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे.याला वैदिक व धार्मिक तसेच आर्थिक व्यवहारिक महत्व प्राप्त झाले आहे.भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे गाईला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. याचेच औचित्य साधत गुरुवार दि.९/११/२०२३ रोजी पिंपळे सौदागर,कुणाल आयकॉन रोड येथील दत्तमंदिर येथे “वसुबारस” निमीत्त सामुहिक रित्या “गोमाता पुजन” करण्यात आले.
यावेळी सौ.निर्मलाताई कुटे यांच्या वतीने गोमातेचे औक्षण करुण सामुहिक रित्या आरती करण्यात आली.यावेळी पिंपळे सौदागर व रहाटणी भागातील महिला व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होत्या.
भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून “वसुबारस” या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. या प्रसंगी ५०० हुन अधिक महिलांनी “गोमातेचे” पुजन केले व पिंपळे सौदागर सारख्या शहरी वस्तीमधे वसुबारसे च्या दिवशी “गाई व वासराची” पुजा करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल नागरीकांनी कृतज्ञता व समाधान व्यक्त करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. वसुबारस पुजनाने दिवाळीस प्रारंभ झाला असून या उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या दारी गायीला महत्व आहे. वसुबारस पुजनाने घरात नवचैतन्य प्रकाशमय वातावरण निर्माण होते, ते आपल्या परिसरात ही व्हावे, नवीन पिढीला याबाबत कल्पना यावी, हा या वसुबारस पुजनामागील उद्देश आहे.”
सौ.निर्मलाताई कुटे